जत तालुक्यातील उटगी ते उमदी रस्त्यावरील अपघातात एकजण ठारजत/प्रतिनिधी: तालुक्यातील उटगी ते उमदी रस्त्यावर दुचाकी व छोटा हत्ती टेम्पोच्या धडकेत एकजण ठार झाला आहे. अमोल सावळा साठे (वय ३५,रा.हसबेवाडी, ता. मंगळवेढा) असे ठार झालेल्या दुचाकी चालकाचे नाव आहे.
     याबाबत अधिक माहिती अशी, अमोल साठे हा सोन्याळहून उमदीकडे चालला होता. उटगी ते उमदी दरम्यान समोरून आलेल्या छोटा हत्ती टेम्पोला धडक झाली. त्यात अमोल साठे हा जागीच ठार झाला आहे.
उमदी पोलीसांनी घटनास्थळी पाहणी करून, जत येथे शवविच्छेदन करून मृत्तदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला आहे. अधिक तपास उमदी पोलीस करत आहेत.

Post a Comment

0 Comments