जत येथील अपघातात ट्रक चालक जागीच ठार तर दोघे गंभीर जखमीजत/प्रतिनिधी: विजयपूर गुहागर राष्ट्रीय महामार्गावर जत पासून काही अंतरावर मुरूनहट्टी फाटा, मुंचडी गावच्या हद्दीजवळ शनिवारी दुपारी दोन ट्रकच्या समोरासमोर झालेल्या अपघातात एकजण ठार झाला आहे. तर दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. सिद्धेश्वर मधुकर इंगवले (वय २२, रा. पाठकळ, ता. मंगळवेढा, जि. सोलापूर) असे ठार झालेल्या ट्रक चालकाचे नाव आहे. तर महिंद्र नवनाथ थोरात (वय २८, रा.मुगाव, पाटोदा, जि. बिड) व तुषार टेकाळे (वय २५, येवलवाडी ता. पटोदा, जि.बिड) अशी जखमीची नावे आहेत. जखमीला मिरजेच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
        घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी, जामखेड येथील युवराज राऊत यांच्या मालकीचा मालवाहतूक ट्रक (एमएम १६, एवाय् ९५९८) हा चालक सोहेल रशिद शेख (रा.महिंद्रवाडी,ता.पाटोदा जि.बिड) हा मालूर तामिळनाडू येथून अल्युमिनियम भरून अहमदनगरकडे येत होता. तर दुसरा मालवाहतूक  ट्रक (एमएच १३, एक्स २७८६) चालक सिध्देश्वर मधुकर इंगवले (वय २२,रा.पाटकळ,ता.मंगळवेढा, जि. सोलापूर) हा जतकडून विजापूरकडे मँगनेट भरून भरधाव वेगाने चालला होता. दोन्ही ट्रकचे व आतील मालाचे मोठे नुकसान झाले आहेत. जखमीवर मिरज शासकीय रुग्णालय उपचार सुरू आहेत. याप्रकरणी रात्री उशिरापर्यत जत पोलीसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

Post a Comment

0 Comments