जत तालुक्यात वाळू तस्करी वाढली; नव्याने दाखल झालेले अधिकारी कधी सक्रीय होणार

वाळू तस्करांना रान मोकळे; गत पंधरवड्यात तस्करी दुप्पट


जत/प्रतिनिधी: जत तालुक्यात वाळू तस्करांनी धुडगूस घातला असून काही राजकीय नेत्यांबरोबर फोटो काढणारे फंटर तस्करांनी महसूल यंत्रणेला दास बनविल्याने या तस्करांना रोकणाल कोन? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. एकीकडे जत लगतच्या मंगळवेढा तालुक्याचे तहसिलदारांनी वाळू तस्करांना सळो की पळो करून सोडले असून, दंडात्मक कारवाईच्या भितीमुळे वाळू तस्करांमध्ये खळबळ माजली आहे. तशी कारवाई जत तालुक्यात कधी होणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे. 
       जत आणि संख अप्पर अशी दोन तहसील कार्यालये वाळू तस्करी रोकण्यात अपयशी ठरले असून, नव्या अधिकान्यांचा वेळ सत्कार स्विकारण्यात जात असल्याने तस्करांना रोकण्यात त्यांची उदाशीनता स्पष्ट झाली आहे. तालुक्याच्या शेजारील असलेल्या सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्याचे तहसिलदार स्वप्निल रावडे यानी विनापरवाना वाळू उपसा करणाऱ्या वाळू तस्करांची नाकाबंदी करीत. त्याच्यावर दंडात्मक कारवाईचा घडाका लावला आहे.
        मंगळवेढा शहरासह तालुक्यात ज्या ज्या ठिकाणी नविन बांधकामे सुरु आहेत. अशा ठिकाणी वाळूचा साठ करणारे बांधकाम मालक व ठेकेदार यांच्याकडून वाळू परवाना घेतला आहे का? याची पथकामार्फत चौकशी चालू केली असून जर त्यांच्याकडे वाळू परवाना नसेल तर अशा बांधकाम करणारे मालक व ठेकेदार यांच्यावर प्रतिबास ४० हजार रूपये दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. या कारवाईचा धसका वाळूतस्करांनी घेतला असल्याने वाळू तस्करी रोकण्यात मोठे यश मिळविले आहे. दुसरीकड तस्करांचे मोठे जाळे असलेल्या जत तहसील व संख अप्पर तहसील कार्यालय हद्दीत वाळू तस्करांचे भांडारे असून कोरडा व बोर नदीचे वाळू तस्कर दिवसा ढवळ्या लचके तोडत आहेत. त्यांना रोकण्याची जबाबदारी असलेले तहसीलदार जीवन बनसोडे व अप्पर तहसीलदार एस. आर. मागाडे यांच्याकडून तस्करांना पायबंद बसेल अशी अपेक्षा होती. मात्र त्यांनी पदभार घेतल्यापासून वाळू तस्करी दुप्पट वाढल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. 
        विशेष म्हणजे वरिष्ठ अधिकारी असलेले व नव्याने आलेले प्रांताधिकारी जोगेंद्र कट्यारे यांचे हाताची घड़ी तोंडावर बोट ही भूमिका संशय बळावणारी असल्याचे आरोप होत आहेत. जत शहरासह गावागावातील बांधकामासमोरील वाळूचे ढिगारे त्यांच्या अपयशाची उदाहरणे आहेत. जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनीच आता जत तालुक्यात लक्ष घालावे, अशी मागणी होत आहेत.

Post a Comment

0 Comments