जत येथे स्वातंत्र्याचा अमृत मोहत्सव वर्षानिमित्त मोफत 7/12 वितरण कार्यक्र; शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा आ. सामंतजत/प्रतिनिधी: स्वातंत्र्याचा अमृत मोहत्सव वर्षानिमित्त महाराष्ट्र शासनाचा नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत मोफत 7/12 वितरण कार्यक्रमाचा उदघाटन सोहळा आमदार विक्रमसिंह सावंत यांच्या हस्ते अमृतवाडी ता.जय येथे पार पडला. यावेळी तालुक्यातील शेतकऱ्यांनी मोफत सात-बारा योजनचा लाभ घेण्याचे आवाहन आ. सावंत यांनी मोफत सातबारा वितरण प्रसंगी ते बोलत होते. 
      महाराष्ट्र शासनाच्यावतीने अमृत महोत्सव वर्षानिमित्त मोफत सात बारा उतारा शेतकऱ्यांना देण्याचा शुभारंभ करण्यात आला यावेळी यावेळी प्रांताधिकारी जोगेंद्र कट्यारे, तहसीलदार जीवन बनसोडे, संखचे अप्पर तहसीलदार सुधाकर माघाडे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष आप्पाराया बिराजदार, माजी सभापती बाबासाहेब कोडग, सरदार पाटील, तुकाराम माळी मंडळ अधिकारी संदीप मोरे, तलाठी रवींद्र घाडगे, कोतवाल सुभाष कोळी उपस्थित होते.
       यावेळी आ. सावंत बोलताना म्हणाले की, सध्याचे युग हे संगणकीय युग असून ई- पीक पाणी हे आपल्या मोबाईल वरून शेतकऱ्यांना सर्व माहिती शासनाला देता येत ९२ हजार २३७ खातेदारांना मोफत सातबारा मिळणार असून ज्या सातबा यामध्ये त्रुटी असेल त्या प्रशासनाने दूर करून घ्याव्यात. शेतकऱ्यांनी या योजनेचा माध्यमातून आपले क्षेत्रफळ किती आहे याचीही माहिती घ्यावी. मी आमदार झाल्यानंतर प्रशासनाकडे सतत पाठपुरावा करून म्हैसाळ योजनेचे पाणी जास्तीत जास्त क्षमतेने सोडण्यासाठी पाठपुरावा केला आहे. कोणत्याही योजनेतून जत तालुक्यातील शेतकऱ्यांना लवकरात लवकर पाणी मिळावे यासाठी मी शासन दरबारी पाठपुरावा करत आहे. कृषी विभागाच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आव्हान यावेळी सावंत यांनी केले.
       महसूल विभाग, महाराष्ट्र शासन मार्फत स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त संगणकीकृत डिजिटल स्वाक्षरीकृत मोफत सात बारा वाटप शनिवारी महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त या योजनेचा शुभारंभ अमृतवाडी येथे करण्यात आला. यावेळी प्रांताधिकारी जोगेंद्र कट्यारे, तहसीलदार जीवन बनसोडे यांनी मनोगत व्यक्त केले. तसेच शेतकऱ्यांना शासनाच्या विविध योजनेची माहिती दिली.

Post a Comment

0 Comments