11 ऑक्‍टोबर रोजी महाविकास आघाडीकडून जत बंदचे आवाहन; आ.सावंत । राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष रमेश पाटील । शिवसेना जिल्हा उपाध्यक्ष रफिक शेख

11 ऑक्‍टोबर रोजी महाविकास आघाडीकडून जत बंदचे आवाहन; आ.सावंत । राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष रमेश पाटील । शिवसेना जिल्हा उपाध्यक्ष रफिक शेख


जत/प्रतिनिधी: उत्तर प्रदेशातील लखीमपूर खिरी येथील न्याय मागणाऱ्या शेतकऱ्यांना भाजपाच्या योगी सरकारकडून चिरडून टाकल्याच्या घटनेचा संपूर्ण देशभरात सर्व स्तरातून तिव्र निषेध करण्यात येत आहे. शांततेच्या मार्गाने आंदोलन करीत असताना शेतकऱ्यांना केंद्रीय गृहराज्यमंत्र्याच्या मुलाने गाडी घाळून चिरडले त्यामध्ये आठ शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. त्याविरोधात देशभरात संतापाचे वातावरण पसरले असून, या घटनेचा निषेध म्हणून सोमवार दि. ११ ऑक्टोबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रभर महाविकास आघाडीच्या वतीने महाराष्ट्र बंद पाळण्यात येणार आहे. यावेळी जत तालुक्यातील विविध राजकीय पक्षातील पदाधिकारी व व्यापारी संघटनांनी या बंद मध्ये सहभागी होऊन आंदोलन यशस्वी करण्यात यावे, अशी माहिती आमदार विक्रमसिंह सावंत यांनी पत्रकार परिषदेत दिली.
       यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष रमेश पाटील, शिवसेना तालुका समन्वयक बंटी दुधाळ, शिवसेना जिल्हा उपाध्यक्ष रफिक शेख, जि.प. सदस्य सरदार पाटील, नगरसेवक भुपेंद्र कांबळे, सलीम पाच्छापूरे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments