कोंतेवबोबलाद येथील तलाठी यांचा अपघाती मृत्यू; तर एक जखमीजत/प्रतिनिधी: तालुक्यातील कोंतेवबोबलाद या ठिकाणी कार्यरत असणारे गावकामगार तलाठी दिपक जगन्नाथ ठाकरे (वय २८) यांचा दुचाकींच्या समोरासमोर झालेल्या धडकेत जागीच मृत्यू झाला.
         याबाबत अधिक माहिती अशी की, जत कोंतेवबोबलाद या ठिकाणी दिपक जगन्नाथ ठाकरे (वय २८ सध्या रा. जत) मुळ गाव धुळे हे तलाठी म्हणून कोंतेवबोबलाद ता.जत येथे कार्यरत होते. बुधुवारी सकाळी ११ वा. च्या दरम्यान हे आपल्या भागात जात असताना दुचाकीचा समोरासमोर अपघात होवून त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर एकजण जखमी झाले आहेत. अधिक तपास उमदी पोलीस करीत आहेत.

Post a Comment

0 Comments