जत मध्ये विविध पदाधिकाऱ्यांचा बहुजन समाज पार्टीमध्ये प्रवेशजत/प्रतिनिधी: बहुजन समाज पार्टी जत विधानसभेच्या वतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये अतुल दादा कांबळे यांच्या उपस्थितीमध्ये जत तालुक्यातील विविध पदाधिकाऱ्यांनी बहुजन समाज पार्टीमध्ये प्रवेश केला. 
      यावेळी अस्लम शेख यांची माडग्याळ सेक्टर विधानसभा सचिव, विकास नाटेकर यांची माडग्याळ सेक्टर बी.व्ही.एफ. संयोजक, संजय धोडमनी यांची उमराणी बुथ अध्यक्ष, मांतेश कुरणे यांची मेंढेगिरी बुथ प्रभारी, सागर केंगार यांची मेंढेगिरी बुथ अध्यक्ष, सागर कांबळे यांची देवनाळ बुथ अध्यक्ष पदी निवड करण्यात आली व त्यांना निवडीचे पत्र देण्यात आले.
       यावेळी मार्गदर्शन करताना अतुल दादा कांबळे यांनी पक्षाची ध्येयधोरणे सर्व बहुजन महापुरुषांच्या इतिहास व कार्य तसेच फुले शाहू आंबेडकरांचे सामाजिक, शैक्षणिक कार्य व कांशीराम साहेब व बहन कु. मायावतीजी यांच्या जीवन कार्याची माहिती दिली. प्रास्ताविक शहराध्यक्ष सुनिल क्यातन यांनी केले तर आभार शहर उपाध्यक्ष श्रीकांत सोनवणे यांनी मानले.
       यावेळी जिल्हा सचिव जकाप्पा सर्जे, विधानसभा महासचिव शरद शिवशरण, सेक्टर अध्यक्ष सचिन झेंडे, सेक्टर अध्यक्ष विक्रम कांबळे, शहर महासचिव दिपक कांबळे, उत्तम पारसे, अनिल पारसे,  सर्व पदाधिकारी तसेच बसपाचे सेक्टर बुथ व जत तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments