चिखलगी भुयार व गोंधळेवाडीत श्री संत बागडेबाबांची पुण्यतिथी साधेपणाने साजरी

दोन कोटींचा निधी देणार- आ. समाधान आवतडे

जत/प्रतिनिधी: श्री संत सयाजी बागडेबाबा महाराज यांची २७ वी पुण्यतिथी जत तालुक्यातील गोंधळेवाडी व मंगळवेढा तालुक्यातील चिखलगी येथे चिखलगी भुयार मठाचे मठाधिपती तुकाराम बाबा महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली पुण्यतिथीनिमित्य मठात धार्मिक कार्यक्रम तसेच फुले टाकण्याचा कार्यक्रम भक्तीपूर्ण वातावरणात पार पडला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर श्री संत सयाजी बागडेबाबा महाराज यांची पुण्यतिथी सोहळा साधेपणाने साजरा करण्याचे आवाहन मठाधिपती तुकाराम बाबा महाराज यांनी केले होते. पाच ते १२ सप्टेंबर दरम्यान मठात विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 
१२ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजता मठात पुण्यतिथीनिमित्त फुले टाकण्याचा कार्यक्रम पार पडला. तत्पूर्वी मठाधिपती तुकाराम बाबा महाराज यांनी श्री संत बागडेबाबा महाराज यांच्या कार्याची महती सांगत सर्वांना मंत्रमुग्ध केले. श्री संत बागडेबाबा महाराज यांनी केलेल्या कार्याची माहिती मठाधिपती तुकाराम बाबा महाराज यांनी आपल्या भजन व किर्तनातून दिली. पुण्यतिथीनिमित्य तुकाराम बाबा यांनी श्री संत बागडेबाबा ही जगाची सावली होते व ते सोडून गेले असले त्यांच्या कार्यातून ते जिवंत असल्याचे सांगत भक्तिमार्गाच्या वाटेवर चला असे आवाहन त्यांनी केले.

मठाला दोन कोटींचा निधी देणार- आ. समाधान आवतडे-
     श्री संत बागडेबाबा यांनी आयुष्यभर समाजसेवा करत समाजाशी एक वेगळी नाळ त्यांनी जोडली. समाज प्रबोधन करण्याचे काम केले, दिन, दलित, दुबळ्यांना सहकार्य केले, अंधश्रद्धेविरुद्ध लढा उभा केला. त्यांच्या या कार्याची महती सर्वत्र पसरावी यासाठी चिखलगी भुयार मठ येथे शासनाकडून दोन कोटींचा निधी देणार आहे. आपणही श्री संत बागडेबाबा यांचे शिष्य असून मठाला सर्वतोपरी सहकार्य करू असे जाहिर आश्वासन आ. आवतडे यांनी दिले.

Post a Comment

0 Comments