जत/प्रतिनिधी: जत तालुका बेलदार समाज संघटनेच्या वतीने श्री मरगुबाई देवीची मुर्ती स्थापना व मंदिर लोकार्पण सोहळा उमराणी रोड जत येथे मंगळवार दि ३१ ऑगस्ट रोजी करण्यात आला. या कार्यक्रमास प्रमुख उपस्थितीम्हणून जतचे आमदार विक्रमसिंह सावंत उपस्थित होते. यावेळी बोलताना ते म्हणाले की, आमदार फंडातून शक्य तेवढी आर्थिक मदत करून बेलदार समाजाच्या विकास कामासाठी मी नेहमी प्रयत्नशील राहीन, अशी ग्वाही आमदार सावंत यांनी जत येथील बेलदार समाजाच्या वतीने उभारण्यात आलेल्या श्री मरगुबाई देवीची मूर्ती स्थापना व समाजमंदिर लोकार्पण सोहळ्याप्रसंगी दिली.
जत येथील बेलदार समाजाच्या पुढाकाराने उमराणी रोड येतील आनंद मैदानावर बांधण्यात आलेल्या श्री मरगुबाई मंदिराचे सोहळा नुकताच संपन्न झाला याप्रसंगी आमदार विकमसिंह सावंत, माजी आमदार विलासराव जगताप,माजी सभापती सुरेश शिंदे,नगराध्यक्षा शुभांगी बन्नेनवर, उपनगराध्यक्ष आप्पासो पवार ,परशुराम मोरे,बाबासाहेब कोडग,उमेश सावंत,प्रकाश माने,मिथुन भिसे,अरुण जाधव,भाऊसाहेब पवार,शिवाजी मोहिते,एकनाथ मोहिते,दादासाहेब चौगुले,रमेश पवार, विजय पवार,रवींद्र पवार,नितीन पवार,रोहित मोहिते,उमेश पवार,संदीप जाधव,धनंजय मोहिते,सचिन मोहिते,अमोल पवार,राजू जाधव,राजु पवार,महेश पवार व अन्य काही मान्यवर तसेच सर्व बेलदार समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments