माजी सैनिक कल्याण संघटना पुनर्जीवित करणे व सेवानिवृत्त सैनिकांचा सत्कार सोहळा      जत तालुक्यात सन 1983 साली माजी सैनिक कल्याण संघटना स्थापन करण्यात आली होती. ही संघटना 2002 पर्यंत माजी सैनिकांच्या कल्याणासाठी सक्रिय होती. या संघटनेने बरेच असे चांगले उपक्रम राबवले आहेत. संघटनेच्या सदस्यांच्या वयोवृद्धा पणामुळे आणि त्यांच्या वैयक्तिक अडचणीमुळे संघटना सक्रिय झाली नव्हती. सदरच्या संघटनेला पुनर्जीवन करण्यासाठी सुभेदार दत्ता बाळकृष्‍ण शिंदे. (से.नि) हॉन कॅप्टन बबनराव जगन्नाथ कोळी आवंडी. सेवानिवृत्त संघटनेचे गटन करण्यासाठी मागील दोन ते तीन महिन्यापासून पाठपुरावा करण्यात आला व संघटना पुन्हा निर्मिती करण्यात आली. यावेळी आमदार विक्रमसिंह सावंत व माजी सभापती बाबासाहेब तात्या कोडक उपस्थित होते
       यावेळी मार्केटयार्ड जत, मार्केट कमिटी सभाग्रह येथे, नूतन पदाधिकारी व सभासदांच्या निवडी करण्यात आल्या, यामध्ये जत तालुका एक्स सर्विसमेन वेल्फेअर असोसिएशनच्या अध्यक्षपदही सुभेदार दत्ता बाळकृष्ण शिंदे. (से नि) शेगाव. उपाध्यक्षपदी कॅप्टन बबनराव जगन्नाथ कोळी सेवानिवृत्त अवंडी व हवलदार महेश कुमार वामन जगताप सेवानिवृत्त निगडी. सचिव पदी हवलदार बाळासाहेब दादासाहेब भोसले अंतराळ सेवानिवृत्त. व खजिनदारपदी दत्तात्रय आकाराम शिंदे जत सेवानिवृत्त. हॉन कॅप्टन विजय कुरणे मेंढेगिरी सेवानिवृत्त. खजिनदार हवालदार विजय गोविंद पवार सेवानिवृत्त सनमडी. तसेच सदस्यपदी सुभेदार मेजर आकाराम गणपती भिसले सेवानिवृत्त कुंभारी. सुभेदार मेजर सतीश रंगराव शिंदे अचकनळी सेवानिवृत्त. सुभेदार मेजर सिध्दु रामभाऊ गायकवाड सेवानिवृत्त असंगी. हवालदार दिपक आनंदा खांडेकर बागलवाडी सेवानिवृत्त सैनिकांची निवड करण्यात आली. 
        यावेळी सेवानिवृत्त सैनिकांचा सत्कार सोहळा संपन्न झाला-
1) सुभेदार मेजर रावसाहेब लक्ष्मण मरगळे आवंडी.
 2)नायब सुभेदार तुकाराम गायकवाड सोरडी.
3) हवलदार बाळासाहेब नामदेव जमदाडे येळवी. यांचा सेवानिवृत्त चा सोहळा माजी सैनिक संघटनेमार्फत संपन्न झाला यावेळी उपस्थित मान्यवर मा. आमदार श्री विक्रम दादा सावंत. माजी सभापती बाबासाहेब कोडग (तात्या). जिल्हा परिषद सदस्य सरदार पाटील माजी सैनिक. ज्येष्ठ माजी सैनिक कॅप्टन टकले साहेब संघटनेचे मार्गदर्शक  हॉन कॅप्टन नामदेव कटरे ज्येष्ठ मार्गदर्शक माजी सैनिक हॉन कॅप्टन बाजी वाघमोडे ज्येष्ठ मार्गदर्शक माजी सैनिक बाळासाहेब कोडग काका आवंडी. सीएसडी कॅन्टीन मॅनेजर हॉन कॅप्टन उमाजी मारनुर.हॉन कॅप्टन पांढरे यावेळी सर्व माजी सैनिक उपस्थित होते.
     या संघटनेचे उद्दिष्ट-
1) सेवानिवृत्त जवानांचा संघटनेमध्ये सभासद करून घेणे.
2) शहीद जवानांच्या व जेष्ठ जवानांच्या अडीअडचणी जाणून घेणे व उपाय काढणे.
3) विधवा पत्नी यांचे डॉक्युमेंट व त्यातील त्रुटी यावर उपाय करणे व त्यांचे मत जाणून घेणे व निवारा करणे.
3) माजी सैनिकांच्या पार्ट टू ऑर्डर व तसेच कार्ड व इतर समस्या सोडवण्यासाठी सुविधा निर्माण करणे.
4) माजी सैनिकांसाठी ECHS हॉस्पिटल व आपल्या तालुक्यातील सुरू करण्यासाठी प्रयत्न शील राहणे.
  •         यावेळी बोलताना आमदार विक्रमसिंह सावंत म्हणाले की, मार्केटयार्ड येथील प्लॉट नं 33 या ठिकाणी कार्यालय उभा करणे व नवीन जागेवर  सैनिक भवन उभा करून देऊ असे ते यावेळी बोलताना म्हणाले.

Post a Comment

0 Comments