जत शहरातील प्रभाग एक मध्ये दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत १ कोटी ५९ लाखाच्यावर निधी मंजूर : नगरसेविका विनता साळेजत/प्रतिनिधी: दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत जत शहरातील प्रभाग एक मध्ये १ कोटी ५९ लाखाच्यावर निधी मंजूर झाला असल्याची माहिती नगरसेविका वनिता साळे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. 
        शहरातील प्रभाग एक मध्ये एकूण १३ कामे मंजूर करण्यात आली आहेत. यामध्ये रुपेश कांबळे घर ते वाघमोडे घर ट्रीमिक्स काँक्रीटीकरण (१५ लाख६ हजार२०३ रुपये), माने घर ते होनमोरे घर ट्रीमिक्स रस्ता करणे (८लाख२२हजार), सुनिल शिंदे घर ते चंदनशिवे घर ट्रीमिक्स काँक्रीटीकरण (२ लाख५६ हजार रुपये), संदीप मोरे घर ते दत्ता बुरुटे घर गटार काम (१२ लाख ३हजार रुपये), संजय कोळी घर ते बाळू संकपाळ घर ट्रीमिक्स रस्ता करणे (१७ लाख ५३ हजार रुपये), जाधव घर ते अमोल कांबळे घर ट्रीमिक्स रस्ता व आरसीसी गटार करणे (१२लाख ७७ हजार), साळुंखे घर ते पवार घर ट्रीमिक्स रस्ता करणें १२ लाख ६० हजार रुपये), साळेवस्ती  अतंर्गत ट्रीमिक्स काँक्रीट रस्ता करणे (२४ लाख १४ हजार रुपये), यशवंत सोसायटी खुल्या जागेत भिंत बांधणे (२६ लाख ८५ हजार रुपये), संजय कांबळे ते कणसे घर ट्रीमिक्स रोड व गटार करणे (६० लाख ७२ हजार), यशवंत सोसायटी अंतर्गत काँक्रीट गटार करणे (१३लाख ४५हजार रुपये), रमेश साळे ते कट्टीमनी घर काँक्रीट रस्ता करणे (८लाख८३ हजार), दत्ता कांबळे घर नामदेव कांबळे घर काँक्रीट रस्ता करणे (४ लाख २८ हजार रुपये), मानसिंग कांबळे घर ते पप्पू कांबळे घर गटार करणे ( ७लाख २१ हजार रुपये) अशी कामे मंजूर झाली आहेत. 
        या कामांसाठी आमदार विक्रम सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली नगराध्यक्षा शुभांगी बन्नेणावर यांच्याकडे सतत पाठपुरावा करून ही कामे मंजूर झाली आहेत. प्रभागाचा विकास हेच ध्येय डोळ्यासमोर ठेवून गेल्या साडेतीन वर्षाच्या काळात नगरसेविका साळे यांनी दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत ४ कोटींची कामे केली असल्याचे त्यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments