संख ता.जत येथे दि.२६ रोजी भव्य शेतकरी व कॉंग्रेस कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन; आप्पाराया बिराजदार व सुजय शिंदे


जत/प्रतिनिधी: जत तालुका कॉंग्रेस कमिटीच्या वतीने रविवार दि.२६/०९/२०२१ रोजी संख येथे सायंकाळी ४ वा. भव्य शेतकरी व कॉंग्रेस कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
       या मेळाव्यास राज्याचे गृहराज्य मंत्री मा.ना.सतेज उर्फ बंटी पाटील, सहकार व कृषी  राज्यमंत्री मा.ना.विश्वजित कदम, कर्नाटक राज्याचे माजी जलसंपदा मंत्री मा.आम.एम.बी.पाटील, आमदार विक्रमसिंह (दादा) सावंत महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल (दादा) पाटील, सांगली शहर कॉंग्रेस कमिटी अध्यक्ष पृथ्वीराज पाटील तसेच कॉंग्रेस नेत्या जयश्रीताई पाटील आदि मान्यवर उपस्थित राहून कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत.
       या कार्यक्रमामध्ये जत तालुक्यातील विविध पक्षांचे पदधिकारी कॉंग्रेस पक्षामध्ये पक्ष प्रवेश करणार आहेत. तरी तालुक्यातील कॉंग्रेस पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांनी व शेतकरी बांधवांनी या मेळाव्यास उपस्थित राहण्याचे आवाहन जत तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष आप्पाराया बिराजदार, कार्याअध्यक्ष सुजय (नाना) शिंदे यांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments