ह्या ठेकेदाराला नोबल पारितोषिक द्या; विद्युत पोल न हटवताच केले रस्त्याचे कामजत/प्रतिनिधी: जत येथिल औद्योगिक प्रशिक्षण संस्थेकडे जाणारे रस्त्याचे काम करणारे ठेकेदाराने रस्त्याचे मधोमध विद्युत पोल राखून काम सुरू केल्याने या ठेकेदाराला नोबल पारितोषिक द्यावे अशी मागणी या परिसरातील रहिवाशानी केली आहे. 
         जत नगरपरिषद, जत. १४ वा वित्तआयोग योजनेंतर्गत करण्यात येत असलेल्या सांगलीरोड  आय.टी.आय.काॅलेज, ते  ईदगाह मैदान या रस्त्याचे काम करणारे ठेकेदार यानी रस्त्यातील विध्दूत पोल न हटविता, गटारी व सिडीवर्क न करता काम सुरू केले असून हे काम करणारे ठेकेदाराची खातेनिहाय चौकशी करावी, तसेच निकृष्ठ व दर्जा हिन काम करणारे ठेकेदार यांचे नाव काळ्या यादीत समाविष्ट करावे, अशी मागणी या परिसरातील रहिवाशांकडून करण्यात येत आहे. 
        याबाबत सविस्तर माहिती अशी की, जत शहरासह तालुक्यातील रस्त्याची कामे निकृष्ठ व दर्जा हिन अशी झाली असून सद्या जी कामे सुरू आहेत ती कामेही निकृष्ठ अशी करण्यात येत आहेत. येथील सांगलीरोड, आय.टी.आय.काॅलेज ते ईदगाह मैदान या रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण कामाचे उद्घाटन मोठ्या थाटामाटाने करण्यात आले होते. जतचे माजी आमदार विलासराव जगताप यांच्या शुभहस्ते व जत तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सुरेशराव शिंदे सरकार यांच्या तसेच नगरसेवक स्वप्निल शिंदे, नगरसेविका सौ.बाळाबाई मळगे आदींच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले होते. 
        जत नगरपरिषद १४ वा वित्तआयोग योजनेंतर्गत येथिल सांगली रोड, आय.टी.आय.काॅलेज ते ईदगाह मैदान या ४६ लाख ६० हजार रूपये खर्चाच्या डांबरीकरण कामाला मंजूरी मिळाली असून, सध्या या कामाच्या ठेकेदाराने खडीकरण व डांबरीकरण चे काम सुरू केले आहे. हे रस्त्याचे काम मंजूर करित असताना रस्त्याचे बाजूला गटार करणे अवश्यक असताना गटारीचे काम न करताच रस्त्याचे काम सुरू केले आहे. हे काम सुरू करित असताना या ठेकेदाराने रस्त्याचे मधोमध असलेला विद्युत पोल न काढताच हे काम पुर्ण करण्याची गडबड सुरू केली आहे. त्याचप्रमाणे या रस्त्याचे काम करित असताना सिडीवर्कचे काम बाजूला ठेवले आहे. रस्ता समांतर न करता रस्त्यावर चढउतार ठेवले आहेत. या रस्त्याचे काम ही निकृष्ठ व दर्जा हिन असे झाले असून या संपूर्ण कामाची खातेनिहाय चौकशी करावी तसेच रस्त्याचे मधोमध असलेला विद्युत पोल काढलेशिवाय व सिडीवर्कचे काम पुर्ण केल्याशिवाय सबंधित कामाचे ठेकेदार यानी काम सुरू ठेवल्यास हे काम बंद पाडण्याचा ईशाराही या परिसरातील रहिवाशानी दिला आहे.

Post a Comment

0 Comments