जत तालुक्यातील सर्व विद्यार्थ्यांच्या लसीकरनाची मागणी; जत तालुका राष्ट्रवादी विद्यार्थी कांग्रेसजत/प्रतिनिधी: केंद्र सरकारने विद्यार्थ्यासाठी लसींचा स्वतंत्र पुरवठा करून विद्यार्थ्यांचे महाविद्यालय / शाळा / हायस्कूल स्तरावर स्वतंत्र लसीकरण करावे अशी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस, जत तालुक्याच्या माध्यमातून नायब निवासी तहसीलदार माळी यांच्याकडे मागणी अर्ज सादर करण्यात आला.
        गेल्या दिड वर्षांपासून देशातील महाविद्यालये बंद आहेत. देशातील संपूर्ण जनतेच्या लसीकरणाची जबाबदारी केंद्र सरकाने उचलली आहे. केंद्र सरकार राज्यांना लसींचा पुरवठा करत असून त्या पुरवठ्यानुसार लसीकरण सुरू आहे. राज्य शासनाकडून होणारी मागणी आणि केंद्र शासनाकडून होणारा पुरवठा यांमध्ये सातत्याने तफावत आहे. सध्या कोरानो महामारी चे रौद्र रूप पाहता प्राथमिक काळजी घेण्यासाठी तालुक्यातील सर्व महाविद्यालये, हायस्कूल, प्राथमिक शाळा, खाजगी शाळा मधील विद्यार्थ्यांना लसीकरण करणे अत्यंत आवश्यक आहे.
यावेळी
> मोदीजी शिक्षणाचा खेळखंडोबा थांबवा, विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र लसीकरण राबवा..! 
> मोदीजी भाषणांचे वसीकरण थांबवा, विद्यार्थ्यांचे लसीकरण राबवा...!
> मोदी सरकार आतातरी विचार करा थोडा, विद्यार्थ्यांच्या भविष्यात नका घालू खोडा..!!
अश्या विविध घोषणांच्या माध्यमातून केंद्र सरकारचे लक्ष या मुद्यांकडे वेधले जावे. विद्यार्थी हे देशाचे भविष्य आहेत. विद्यार्थ्यांचे नुकसान म्हणजे एका पिढीचं नुकसान. त्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी महाविद्यालये सुरू करण्याबाबत धोरणात्मक निर्णय घेण्यात येत आहेत. केंद्र व राज्य सरकारने त्यासाठी पुढाकार ही घेतला आहे.
       यासाठी राष्ट्रवादी विद्यार्थी कांग्रेस, जत तालुका चे अध्यक्ष सतीश उर्फ पवन कोळी व इतर पदाधिकारी यांच्या वतीने तालुक्यातील सर्व विद्यार्थ्यांना तातडीने लसीकरण करण्याची मागणी करत आहोत.
      यावेळी मा.जत तहसीलदार कार्यालय येथे सदर मागणी अर्ज देतांना राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस तालुकाध्यक्ष सतिश उर्फ पवन कोळी, सोशल मिडिया तालुकाध्यक्ष हेमंत खाडे, राष्ट्रवादी वक्ता प्रशिक्षण उभाग जिल्हा उपाध्यक्ष जयंत भोसले, सागर शिनगारे, विजय फडतरे, शरद सकट, अजित सनदी,दीपक जाधव,रामकृष्ण वाघमोडे, साहेब कोळी,राहुल कोळी, सद्दाम शेख, गुरुगोंडा बिरादार, सचीन पांढरे  इ पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments