बनाळी जिल्हा परिषद गटात शिवसेना व युवासेनाच्या बैठका संपन्न

संजय सावंत व सचिन मदने यांची माहिती

  जत तालुक्यातील बनाळी जिल्हा परिषद गटातील बनाळी,अंतराळ,आवंढी, लोहगाव आदी गावामध्ये शिवसेना व युवा सेना पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेण्यात आल्या.शिवसेनेच्या पक्षवाढीसाठी व काही पदाधिकारी यांचा पक्ष प्रवेश यासाठी या बैठका शिवसेनेचे पश्चिम विभाग तालुकाप्रमुख संजय सावंत व युवासेनेचे पश्चिम विभाग तालुका प्रमुख सचिन मदने यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आल्या होत्या.
यावेळी अनेक आजी, माजी सरपंच ,ग्रामपंचायत सदस्य यांच्यासोबत विविध विषयांवर चर्चा करण्यात आल्या.येणाऱ्या काही दिवसांमध्ये अनेक दिग्गजांचा शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश होणार असल्याची माहिती संजय सावंत व सचिन मदने यांनी दिली.गाव तिथे शिवसेना व गाव तिथे युवा सेनेच्या शाखा स्थापन करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. येणाऱ्या काही दिवसांमध्ये जिल्हाप्रमुख आनंदराव पवार, संजय विभुते, जिल्हा विस्तार अधिकारी किरण सावंत,युवा सेना जिल्हाप्रमुख अँड. किरण सावंत यांच्या नेतृत्वाखाली लवकरच या शाखांचे उद्घाटन करणार असल्याची माहिती मदने यांनी दिली आहे.
बनाळी येथे झालेल्या बैठकीत युवा सेनेचे सचिन मदने म्हणाले, गावातील कोणत्याही अडचणी व गावातील कोणत्या समस्या असतील तर त्या माझ्यापर्यंत पोहचवा. आम्ही जरी उच्च पदाधिकारी नसलो तरी त्या स्तरावरचे काम करू शकतो. एवढी मोठी जबाबदारी माझ्यावर पक्षाने दिली आहे. राज्याचे मुख्यमंत्री हे शिवसेनेचे असल्याने त्यांचे शिवसैनिकांवर लक्ष आहे.मुख्यमंत्र्यांनी सर्वच जिल्हाप्रमुखांना सूचना केल्या आहेत. कोणत्याही शिवसैनिकांवर अन्याय होता कामा नये, यासाठी तुम्ही लक्ष दिले पाहिजे. त्यामुळे तालुक्यात गाव तिथे शिवसेना व युवासेनेचे विचार पोहचवून शाखेचे उद्घाटन करण्याचे नियोजन आहे. शासनाच्या सर्व योजना तालुक्यातल्या शेवटच्या घटकापर्यंत पोचवण्याचे काम युवा सैनिकांनी केलं पाहिजे अशा सूचना जत तालुका युवा सेना प्रमुख सचिन मदने यांनी यावेळी केल्या.

Post a Comment

0 Comments