जतेत मरगुबाई देवीची मूर्ती स्थापना व मंदिर लोकार्पण सोहळा संपन्न


जत/प्रतिनिधी: जत तालुका बेलदार समाज संघटनेच्या वतीने जत शहरातील उमराणी बायपास रोडजवळ श्री मरगुबाई देवीची मूर्ती स्थापना व मंदिर लोकार्पण सोहळा संपन्न झाला. या सोहळ्यासाठी आ.विक्रमसिंह सावंत, मा.आ.विलासराव जगताप, सुरेशराव शिंदे सरकार, नगराध्यक्षा सौ.शुभांगी बन्नेनवर, उपनगराध्यक्ष आप्पासाहेब पवार व सर्व आजी माजी नगरसेवक उपस्थित होते. मंदिर सोहळ्याच्या उद्घाटन प्रसंगी आमदार विक्रमसिंह दादा सावंत बोलताना म्हणाले की, शासनाच्या विविध फडातून आर्थिक मदत करू त्याचबरोबर बेलदार समाजाने विविध क्षेत्रात आपली उन्नती साधण्याचा प्रयत्न केला आहे. मी व माझा पक्ष सदैव आपल्या पाठीशी असल्याचे आ. सावंत बोलताना म्हणाले.
        यावेळी बोलताना माजी आमदार विलासराव जगताप म्हणाले की, बेलदार समाज्याला सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन  मा.आ जगताप यांनी यावेळी केले.
        यावेळी महाराष्ट्र बेलदार संघटनेचे माजी उपअध्यक्ष सर्जेराव मोहिते, बेलदार संघटनेचे सांगली जिल्हा अध्यक्ष अशोक पवार, स्वस्थापक अध्यक्ष मंदिर कमिटी अरुण जाधव, एकनाथ मोहिते जिल्हा उपाध्यक्ष बेलदार समाज संघटना, दादासाहेब चौगुले अध्यक्ष, रमेश पवार उपाध्यक्ष, राहुल जाधव खजिनदार, दीपक जाधव सचिव, रवींद्र पवार, नितीन पवार, मारुती जाधव, अमोल चव्हाण, अनिल चव्हाण, सागर जाधव, विजय पवार, सागर अण्णाप्पा जाधव, ओंकार जाधव, दिनेश जाधव, धनाजी मोहिते, रोहित मोहिते, विजय जाधव, शिवाजी मोहिते व मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन मंदिर कमिटी व्यवस्थापक अध्यक्ष अरुण जाधव तर आभार एकनाथ मोहिते यांनी मानले.

Post a Comment

0 Comments