प्रशासकीय इमारतीच्या बांधकामाला जत पोलिस प्रशासनाचा अडथळाजत/प्रतिनिधी: जत येथिल प्रशासकिय इमारतीच्या बांधकामाला जत पोलीस प्रशासनाचा अडथळा. जेलमधील कैदी व शस्त्रागाराची व्यवस्था लावण्याचे पोलीस प्रशासनासमोर आव्हान.
       जत येथिल स॔स्थानकालीन चिरेबंदी दगडी इमारत भुईसपाट करून त्याजागेवर नविन सर्व सोयीनेयुक्त प्रशासकिय इमारत बांधण्यासाठी शासनाने १२ कोटी रूपये खर्चास मान्यता दिली आहे. 
       पूर्वीच्या संस्थानकालिन इमारतीच्या जागेवर नविन इमारत बांधकाम करण्याचे काम मिरज येथिल मेहरकर कन्सट्रक्शन या ठेकेदाराने घेतले आहे. ही इमारत दोन वर्षाच्या आत पूर्ण करण्याची जबाबदारी या ठेकेदाराची असून ठेकेदाराने नविन प्रशासकिय इमारतीचे बांधकाम सुरू करण्यासाठी जुनी असलेली शंभर वर्षांपूर्वीची संस्थानकालिन इमारत भुईसपाट करण्याचे काम सुरू केले आहे. निम्म्याहून अधिक इमारत पाडण्याचे काम पूर्ण झाले असून जत पोलीस स्टेशन बाजूची कैदी ठेवतात त्या ठिकाणी व पोलीस स्टेशन च्या शस्त्रागाराची खोली पाडताना पोलीस प्रशासनाने ठेकेदाराला थांबविले आहे.
       जत पोलीस स्टेशन ला सद्धस्थितीत कैदी ठेवण्यासाठी बराक नाहीत. तसेच पोलीस स्टेशनकडील शस्त्रागाराची ही व्यवस्था नाही. त्यामुळे येथिल कैद्यांची व्यवस्था व शस्त्रागाराची व्यवस्था करण्याची समस्या पोलीस प्रशासनापुढे आहे.
 त्यामुळे त्यानी हे काम थांबविले आहे. त्याचप्रमाणे पोलीस प्रशासनाचे म्हणणे आहे की, ठेकेदार मेहरकर यानी पोलीस स्टेशनच्या शस्त्रागारासाठी तात्पुरती व्यवस्था करून द्यावी या दोघांच्या वादात प्रशासकिय इमारतीच्या बांधकामात अडथळा आला असून असे जर होत राहीले तर जतकरांचे जत प्रशासकिय इमारतीचे स्वप्न पूर्ण होणार? ठेकेदार मुदतीत प्रशासकिय इमारतीचे बांधकाम कधी पूर्ण करणार का? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

Post a Comment

0 Comments