शिक्षकदिनानिमित्त योगेशबाबा मोटे यांना कोरोना योद्धा पुरस्काराने सन्मानितजत/प्रतिनिधी : कोरोनाच्या पहिल्या व विशेषतः दुसऱ्या लाटेत जत तालुक्यातील रुग्णांची सेवा करताना स्वतःच्या जीवाची पर्वा न करणारे एक नांव म्हणजे योगेशबाबा मोटे. 108 या रुग्णवाहिकेचे चालक अशी सेवा देत योगेशबाबा यांनी कोरोणाबाधित रुग्णांची सेवा व त्यांना मानसिक आधार तर दिलाच शिवाय काही रुग्णांवर स्वखर्चाने अंत्यसंस्कार केले. याची दखल घेत योगेशबाबा मोटे यांना शिक्षक दिनानिमित्त कोरोना योध्दा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
        शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेत संभाजी कोडग सर यांनी कोरोना योद्धा म्हणून सन्मान केला. हा पुरस्कार विक्रम फाउंडेशनचे अध्यक्ष युवराज ऊर्फ बाळ निकम यांच्या हस्ते देण्यात आला. या कार्यक्रमाला सर्व शिक्षक विक्रम फाऊंडेशनचे अध्यक्ष अॅड युवराज निकम, काँग्रेसचे जत शहर अध्यक्ष तथा नगरसेवक भूपेंद्र कांबळे, पत्रकार मनोहर पवार, अनिल मदने, युवा नेते संतोष देवकर, मोहन माने-पाटील आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments