उमदी येथे पाण्यात बुडून दोन सख्ख्या बहिणींचा मृत्यू; ओढ्यात अंघोळ जीवावर बेतलीजत/प्रतिनिधी: राज्यभरात पावसाने धुमशान घातले आहे. नदी-नाले तुडुंब भरून वाहत आहे. अनेक ठिकाणी पाण्यात वाहून जाण्याच्या दुर्दैवी घटना घडत आहे. उमदी ता.जत गावाच्या ओढ्यात अंघोळीसाठी गेलेल्या दोन्ही सख्ख्या बहिणींचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. तर या दुर्घटनेत त्यांचा सहा वर्षांचा लहान भाऊ थोडक्यात बचावला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जत तालुक्यातील उमदी गावात ही घटना घडली आहे. आंघोळीसाठी गेलेल्या दोन्ही सख्ख्या बहिणीचा पाण्याचा अंदाज न आल्याने रेणुका शिवानंद ऐवळे (वय 7) आणि लक्ष्मी शिवानंद ऐवळे (वय 11) यांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
        तर त्याच्या सोबतच पोहायला गेलेला लहान भाऊ मायाप्पा शिवानंद ऐवळे (वय ६) हा बचावला आहे.  ऐवळे कुटुंबीय हे काही दिवसांपासून उमदी गावात ओढ्यालगत असणाऱ्या आपल्या घरात राहत होते. मोलमजुरी करून उदरनिर्वाह करत होते. आज सकाळी घरातील सर्वजण दुसऱ्यांच्या शेतात कामासाठी गेले होते. घरात दोन मुली आणि एक मुलगा हे घरात होते. दुपारी आंघोळ करण्यासाठी दोन्ही बहिणी आणि एक भाऊ असे तिघे मिळुन ओढापात्रात आंघोळी करण्यासाठी गेले. परंतु, पाण्याचा अंदाज न आल्याने या दोन्ही सख्ख्या बहिणीचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.  तर त्याचवेळी त्यांच्या सोबतच पोहण्यासाठी गेलेला लहान भाऊ मायाप्पा शिवानंद ऐवळे याला पाण्यात बुडताना ओढ्यालगत जनावरे राखणारा संभाजी माने या युवकाने पाहिले आणि त्यांने तात्काळ उडी घेत त्या चिमुकल्याचे प्राण वाचवले. या घटनेने उमदी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Post a Comment

0 Comments