अखेर जत तहसीलदारपदी जीवन बनसोडे यांचे नियुक्ती । जोगेंद्र कट्यारे नवे प्रांत । संखचे अप्पर तहसील पद अद्याप प्रतीक्षेत

जत/प्रतिनिधी : अखेर जत तहसीलदारपदी जीवन बनसोडे यांचे नियुक्ती. संख ता.जत येथे नियुक्ती आदेश झालेले जीवन बनसोडे यांची नियुक्ती अंशत: बदल करून त्यांचे जत तहसील येथे नियुक्ती आदेश महसूल विभागाकडून जारी करण्यात आले आहेत. त्यामुळे गेल्या सव्वा महिन्यापासून रिक्त पदावर तहसीलदार बनसोडे‌ हे सोमवारी कार्यभार  स्विकारतील असे नियुक्ती आदेशात म्हटले आहे. दुसरीकडे संख अप्पर तहसील कार्यालयाला अद्याप अप्पर तहसीलदार यांची प्रतिक्षा आहे. प्रांताधिकारी प्रंशात आवटे यांचेही बदलीचे आदेश निघाले असून त्यांच्या जागेवर रामटेकचे उपविभागीय अधिकारी जोंगेद्र कट्यारे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दुसरीकडे संख अप्पर तहसील कार्यालयाला अद्याप अप्पर तहसीलदारांची प्रतिक्षा कायम आहे. पावनेतीन महिन्यापुर्वी संखचे अप्पर तहसीलदार हणमंत म्हेत्रे हे लाचलुचपत विभागाच्या कारवाईत पकडल्यापासून हे पद रिक्तच आहे.


संखचे अप्पर तहसील पद अद्याप प्रतीक्षेत-

       काही महिन्यांपूर्वी संख ता. जत येथील अप्पर तहसीलदार हणमंत म्हेत्रे याना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईत पकडल्या पासून, त्यांच्या जागी अद्याप नूतन अप्पर तहसीलदार यांची नियुक्ती करण्यात आली नाही. तर तलाठी हे कधीच वेळेवर जागेवरती हजर नसल्यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल उठले आहेत. तसेच संख अप्पर तहसील परिसरातील सेतू कार्यालय व एजंटांकडून नागरिकांची प्रचंड लूट केली जात आहे. त्यामुळे प्रशासनाच्या या भोंगळ कारभारावरती संख परिसरातील नागरिकांमधून प्रचंड नाराजी व्यक्त केली जात आहे.

Post a Comment

0 Comments