विद्यार्थ्याना संघर्ष करण्या शिवाय पर्याय नाही; डॉ.नानासाहेब थोरातजत/प्रतिनिधी: जगा मध्ये ज्या ज्या व्यक्तीनी मोठे नाव कमावले आहे. त्यांनी अतोनात संघर्ष केला आहे. तरी आपल्या परिस्थितीचा बाऊ न करता सतत संघर्ष करत राहा. एक ना एक दिवस तुमच्या कष्टाला फळ नक्की येईल असे प्रतिपादन ऑक्स्फर्ड विद्यापिठातील वरीष्ठ संशोधक डॉ.नानासाहेब थोरात यानी केले. 
       युथ फॉर जत या सामाजिक सेवाभावी संस्थेच्या कार्यालय उद्घाटन प्रसंगी थोरात बोलत होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार विक्रमसिंह सावंत उपस्थित होते. 
       जगातल्या शंभर उत्क्रुष्ठ विद्यापिठा मध्ये भारतातील एकही विद्यापीठ नाही हि दुर्दैवाची गोष्ट आहे. तंत्रज्ञानाने जगणे सुकर होत असले तरी या तंत्रज्ञानाचे संशोधन भारतात होणे गरजेचे आहे. यासाठी शासन व्यवस्थेनेही पुढाकार घेणे आवश्यक आहे. स्पर्धेच्या युगात नोकरीच्या पाठीमागे न धावता व्यावसायिकतेवर भर देणे ही काळाची गरज आहे. जगाच्या पाठीवर कुठेही कार्यरत असताना आपल्या मात्रुभुमिचे पांग फेडण्यासाठी सदैव तत्पर असले पाहिजे याच भावनेने युथ फॉर जत ने जत मधील विद्यार्थ्यांसाठी चालू केलेले वाचनालय आणि संगणक प्रयोगशाळा ग्रामिण भागातील विद्द्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आणि मार्गदर्शक ठरणार आहेत. यातुनच उद्याचे शास्त्रज्ञ याच भुमितून घडतील ही अपेक्षा आहे.
       अध्यक्षस्थानावरून आमदार विक्रम सावंत म्हणाले की, युथ फॉर जतचे कार्य जतच्या जडणघडणीत मोलाचे आहे. यापुढील काळात या संस्थेला शासकीय स्तरावरुन सर्वतोपरी मदत मिळवून देण्याचा प्रयत्न करण्याची ग्वाही देतो. आमदार फंडातून ७ लाख रुपयांची विविध स्पर्धा परीक्षांची पुस्तके आणि विक्रम फौंडेशन च्या वतीने फर्निचर देण्याचे आश्वासन आमदार सावंत यानी दिले.
        याप्रसंगी विविध शैक्षणिक क्षेत्रामध्ये विशेष प्राविण्य मिळालेल्या गुणवंतांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये डॉ.संजय लठ्ठे, भक्तराज गर्जे, दिलीप वाघमारे, श्रेया हिप्परगी, प्रतिक्षा पाटील यांचा समावेश होता.
       डॉ. मदन बोर्गिकर, डॉ.सुनिल जोशी, डॉ. ग़जानन रेपाळ यानी मनोगत व्यक्त केले. सदर कार्यक्रम प्रसंगी डॉ. मनोहर मोदी, नगराध्यक्षा शुभांगी बन्नेनवर, डॉ. कैलास सनमडीकर, डॉ. संजय बंडगर, यांसह युथ फॉर जत चे अध्यक्ष दिनेश शिंदे सचिन जाधव, प्रशांत अरगोडी, अ‍ॅड. राजकुमार म्हमाणे, प्रमोद साळुंखे यांच्यासह विद्यार्थी, पालक उपस्थित होते. आभार संस्थेचे सचिव अमित बामणे यानी मानले तर सुत्रसंचालन भुपेंद्र बाबासाहेब कांबळे यानी केले.
     
  • वेरीटास कंपनीचे सहव्यवस्थापक असणारे प्रदीप साळुंखे यांच्या सहकार्यातून जत तालुक्यातील प्रयोगशील शाळांसाठी 30 संगणक मोफत देण्यात आले. या उपक्रमाबद्दल युथ फॉर जत च्या वतीने आमदार सावंत यांच्या हस्ते साळुंखे यांचा विशेष सत्कार करण्यात आला.  
आंतरराष्ट्रीय पातळीवरचे संशोधक डॉ.नानासाहेब थोरात हे पहिल्यांदाच जतला येत असल्याने विशेषता विद्यार्थी वर्गासह पालकांचा मोठा उत्साह दिसुन येत होता. डॉ. थोरात यांचे विचार आणि मार्गदर्शन ऐकण्यासाठी सर्व स्तरातील लोक बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रम संपल्यानंतर विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांची उत्तरे डॉ. थोरात यानी देवून बहुमुल्य मार्गदर्शन केले

Post a Comment

0 Comments