जतेत काँग्रेस नगरसेवकाकडून स्वखर्चाने मुरुमीकरणजत/प्रतिनिधी: जत शहर काँग्रेसचे अध्यक्ष व नगरसेवक भूपेंद्र कांबळे यांनी शहरातील दगडी पुलानजीक असणाऱ्या सार्वजनिक शौचालय परिसरात स्वखर्चाने मुरुमीकरण केले.
     याबाबत अधिक माहिती अशी की, दगडी पुलाजवळ सार्वजनिक शौचालय आहे. मात्र या परिसरात चिखल झाल्याने दलदल निर्माण झाली होती. महिलांना जाण्यासाठी अडचण निर्माण झाली होती.
     हा रस्ता पावसाने चिखलमय झाला होता. या रस्त्यावरून जाताना नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागत होती. ही गरज लक्षात घेवून नगरसेवक कांबळे यांनी स्वखर्चातुन रस्त्याचे मुरुमीकरण केल्याने नागरिकांतून समाधान व्यक्त केले जात आहे.

Post a Comment

0 Comments