जत तालुका शिव सहकार सेनेच्या संघटक पदी सचिन मदनेजत/प्रतिनिधी: शिवसेना पक्षप्रमुख व राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशानुसार सेना भवन येथे शिव सहकार सेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. यावेळी जत तालुका शिव सहकार सेनेच्या संघटक पदी सचिन मदने यांची निवड करण्यात आली.
        राज्याचे मुख्यमंत्री पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या आदेशानुसार तसेच शिव सहकार सेना अध्यक्ष शिल्पा ताई सरपोतदार, शिवसेना उपनेते प्रा.नितीनजी बानगुडे पाटील, सांगली जिल्हा प्रमुख आनंदराव बापू, पवार संजय, बापू विभुते, सांगली शहर प्रमुख हरिदास लेंगरे यांच्या उपस्थितीत निवडीचे पत्र देण्यात आले.
        यावेळी जत तालुक्यात सहकार क्षेत्रामध्ये शेतकरी व सहकार सभासदांची पिळवणूक व अन्याय होत असून तो मोडीत काढून सहकार क्षेत्रामध्ये शिवसेना, युवासेना व शिव सहकार सेनेच्या माध्यमातून जत तालुक्यातच्या सहकार क्षेत्रामध्ये लक्ष घालून जनतेला न्याय मिळून देण्याचे काम येणाऱ्या काळात करणार असल्याचे सचिन मदने यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments