जत शहरातील विविध मागण्यांसंदर्भात आर.पी.आयचे आंदोलनजत/प्रतिनिधी: उपविभागीय अधिकारी जत यांच्या कार्यालयातील जनतेशी उद्धट वर्तन करणा-या सुनिल कवठेकर या मग्रुर कर्मचा-यांची त्वरीत बदली करावी व तालुक्यातील विविध शासकिय कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांच्या रिक्त जागेवर अधिकारी व कर्मचारी यांच्या त्वरीत नियुक्त्या कराव्यात यासह विविध मागण्यांसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट सांगली सांगली जिल्हाध्यक्ष संजयरावजी कांबळे व उपाध्यक्ष विकास साबळे यांच्या नेतृत्वाखाली आज जत येथिल उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात आले.
        या आंदोलनात वैद्यकिय सेलचे जिल्हाध्यक्ष मोहसिन इनामदार, आर.पी.आय.जत तालुका (पूर्व) अध्यक्ष. संजय कांबळे, प्रा.अभिजीत आठवलेसर, महाविर मड्डीमनी, रूपसेन उमराणी, राहुल वाघमारे, शिकंदर पटाईत, विवेकानंद स्वामी, संतोष सनदी, बापू खांडेकर, शहाजी ऐवळे, म्हाळाप्पा ऐवाळे, सुनिल गोळे, अरूण सनदी,रविंद्र शिंगे,रामकृष्ण गंगणे, दुर्गाप्पा ऐवळे, विनोद कांबळे, सोमनाथ कांबळे आदी सहभागी झाले होते. 
   जत तालुक्यातील खालील मागण्यांसंदर्भात हे आंदोलन करण्यात आले-
        जत तालुक्यातील विविध शासकिय कार्यालयात अधिकारी यांच्यासह कर्मचारी यांची पदे रिक्त आहेत. ही पदे वर्षानुवर्षे रिक्त असूनही याकडे सरकार लक्ष द्यायला तयार नाही. विविध शासकीय अधिकारी व कर्मचारी यांची पदे रिक्त असल्याने याचा तान इतर कर्मचारी यांच्यावर होत असल्याने त्यांची मानसिक अवस्था बिघडत चालली आहे. व जनसामान्यांची कामे लांबणीवर पडत आहेत. त्यामुळे रिक्त पदे ताबडतोब भरावीत. त्याच प्रमाणे जत येथिल उपविभागीय कार्यालयातील कर्मचारी सुनिल कवठेकर हे तालुक्यातील पक्षकारांशी त्याचप्रमाणे सामाजिक कार्यकर्ते व राजकीय पदाधिकारी यांच्याशी उद्धटपणे वागत आहेत. वाटेल तसे बोलत आहेत, जाणीवपूर्वक पक्षकारांची अडवणूक करून त्यांना त्रास देण्याचे काम करित आहेत. त्यामुळे त्यांची जत उपविभागीय कार्यालयातून त्वरीत बदली करावी. 
        यापूर्वीही आम्ही जनतेच्या विविध प्रश्नांवर व समस्यासंदर्भात उपविभागीय अधिकारी यांच्याकडे निवेदनाव्दारे मागणी करूनही व या प्रश्नावर आंदोलन करूनही त्याची दखल घेतली नाही, त्याचीही चौकशी झाली पाहिजे. जत येथिल लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री. यल्लमादेवी यात्रेकरिता अरक्षित असलेल्या जागेवरील बेकायेशीर अतिक्रमणे, जत हायस्कूल व घाटगेवाडी रोडवरिल ओढापात्रावर प्लाॅटींग साठी धनदांडग्याचे झालेले अतिक्रमणे या संदर्भात चौकशी झाली पाहिजे. 
        जत तालुक्यातील खासगी सावकारी, मटका, चक्रीजुगार बेकायदेशीर व्यवसाय ताबडतोब बंद झाले पाहीजेत, त्याचप्रमाणे डाॅ. रविंद्र आरळी काॅर्नर ते छत्रपती संभाजी महाराज चौकापर्यंतचे रस्त्याचे जे निकृष्ठ व दर्जा हिन काम करण्यात आले आहे. त्याची चौकशी झाली पाहिजे इ. मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले होते. 
       आंदोलना दरम्यान जतचे उपविभागीय अधिकारी प्रशांत आवटे यानी आंदोलन ठिकाणी आदोलन कर्त्यांची भेट घेऊन त्यांच्याकडून निवेदन स्विकारले व मागण्यांसंदर्भात कार्यवाही करण्याचे अश्वासन आंदोलनकर्त्यांना दिले. याप्रसंगी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट सांगली जिल्हा उपाध्यक्ष विकास साबळे म्हणाले की, जत उपविभागीय कार्यालयातील कर्मचारी सुनिल कवठेकर हे विविध कामासाठी जनतेची अडवणूक करित आहेत. पक्षकारांशी तसेच सामाजिक कार्यकर्ते व राजकीय पक्षाची नेतेमंडळी व पदाधिकारी यांच्याशीही उद्धट वर्तन करत आहेत. हा कर्मचारी राहतो सांगलीत व दररोज चारचाकी गाडीतून जतला येतो या कर्मचा-याने अवैद्य मार्गाने जी माया जमा केली आहे. त्याचीही चौकशी झाली पाहिजे. तसेच या मग्रुर कर्मचा-याची त्वरीत बदली झाली पाहिजे असेही साबळे म्हणाले. 
        यावेळी बोलताना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट सांगली जिल्हाध्यक्ष संजयरावजी कांबळे म्हणाले की, प्रशासनाने कार्यवाहीसाठी आम्हाला दहा दिवसांचा वेळ दिला आहे. या दहा दिवसात प्रशासनाकडून पुढील कार्यवाही झाली नाही तर आम्ही उपविभागीय कार्यालय जतला टाळे ठोकू असा इशारा ही कांबळे यांनी दिला आहे.  
       प्रशासनाने आमच्या मागण्यांची दखल घेतली नाही तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्यावतीने उपविभागीय कार्यालयासमोर   यापुढील काळात आम्ही आमरण उपोषणाला बसत आहोत. याची प्रशासनाने नोंद घ्यावी व आमच्या मागण्यांचा गांभीर्याने विचार करावा. असेही कांबळे म्हणाले.

Post a Comment

0 Comments