वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून केले वृक्षारोपण; न्यू संघर्ष गणेशोत्सव मंडळ जतजत/प्रतिनिधी: जत नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष आप्पासो पवार यांच्या वाढदिवसानिमित्त अनावश्यक खर्चाला फाटा देत वृक्ष लागवड करून निसर्गाचा समतोल राखणारा उपक्रम जत येथील न्यू संघर्ष गणेशोत्सव मंडळाकडुन करण्यात आला आहे.
     शहरातील विठ्ठल नगर परिसरामध्ये 100 झाडांची लागवड करून निसर्गाचा समतोल राखणारा उपक्रम ह्या 
युवा वर्गाकडून करण्यात आला आहे. यामुळे परिसरातील नागरिकांकडून या युवा वर्गाचे कौतुक केले जात आहे. यावेळी बोलताना उपनगराध्यक्ष आप्पासो पवार म्हणाले की, येणाऱ्या काळात प्रत्येक युवा पिढीने असे स्तुत्य उपक्रम राबविले पाहिजेत जेणेकरून पर्यावरणाचा समतोल राखला जाईल. व येणारी पिढी एक आदर्श पिढी घडली जाईल. यावेळी संतोष देवकर, रुपेश पिसाळ, बाबा शिंदे, दुर्गाप्पा पवार, राम पवार, नवनाथ पवार व न्यू संघर्ष गणेशोत्सव मंडळातील कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments