शेतकऱ्यांना बिज प्रक्रियेबाबत मार्गदर्शन; गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालयाचे कृषीदूत पंकजकुमार ऐवळे


जत/प्रतिनिधी: गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालयाचे कृषीदूत पंकजकुमार कामू ऐवळे यांचेकडून जत तालुक्यातील रामपूर व खंडनाळ या गावातील शेतकऱ्यांना बिजप्रक्रियेबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
       डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ अंतर्गत गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालय मांडकी पालवन ता. चिपळूण जी. रत्नागिरी चे पंकजकुमार कामू ऐवळे यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन विविध पिकांविषयी व त्यांचे काळजी पूर्वक नियोजन कसे राबवावे या बदल मार्गदर्शन केले.
      जत तालुक्यातील रामपूर व खंडनाळ या गावामध्ये ग्रामीण कृषी कार्यानुभव सन 2021 - 2022 अंतर्गत शेतकऱ्यांना आधुनिक पद्धतीच्या बिजप्रक्रिया, तण व्यवस्थापन, माती परीक्षण, कलम करण्याच्या पद्धती बदल माहीती दिली. या वेळी महेश तुरेवाले, जयसिंग तुरेवाले, आनंद तुरेवाले, युवराज तुरेवाले, गीता तुरेवाले, विराज तुरेवाले आदी शेतकरी उपस्थित होते. या उपक्रमासाठी महाविद्यालयाचे प्रा. संकेत कदम, प्रा. सुनील दिवाळे, प्रा. बाळासाहेब सूर्यवंशी यांनी मार्गदर्शन केले. शेतकरी वर्गाचा या मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळाला

Post a Comment

0 Comments