माजी जि.प.सदस्य दिलीपराव वाघमोडे यांच्या प्रवेशाने काँग्रेसला अभ्यासू व स्वच्छ प्रतिमेचा चेहरा मिळालाजत/प्रतिनिधी: माजी जि.प.सदस्य दिलीपराव वाघमोडे हे अभ्यासू निस्वार्थ व स्वच्छ प्रतिमेचे व्यक्तिमत्त्व म्हणून तालुक्यात एक वेगळी ओळख आहे. त्यांनी आपल्या शैक्षणिक आणि सामाजिक कार्याला रेवनाळ ता.जत या त्यांच्या जन्म गावातून सुरुवात केली. रेवनाळ हायस्कूलच्या उभारणीत त्यांचे महत्वपूर्ण योगदान आहे. गावात जय अहिल्या क्रीडा मंडळाची स्थापना करून तरुणांमध्ये व्यायामाची व खेळाची आवड निर्माण केली. श्री ज्ञानदीप वाचनालयाची स्थापना करून गावात वाचन चळवळ रुजविली, श्री रेवनसिद्धेश्वर नागरी सह. पतसंस्थेची स्थापना करून गरजूंना अर्थसहाय्य केले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी फाउंडेशनची स्थापना करून अनेक समाज उपयोगी शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक उपक्रम राबविले. 
        त्यामुळे बनाळी गटातील जनतेने त्यांना २००७ मध्ये जि. प. सदस्य म्हणून निवडून दिले. जनतेच्या विश्वासाला पात्र राहून, त्यांनी मतदार संघातील प्रत्येक गावात कामे पोहोचविली. विशेषतः शिक्षण, आरोग्य, महिला व बालकल्याण विभागामार्फत त्यांनी नेत्रदीपक कामे केली. प्रत्येक गावात अंगणवाडी इमारती, जि. प .शाळा यांना इमारती व कंपाउंडची कामे करून सुंदर शैक्षणिक कॅम्पस तयार केले. येळवी येथे प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत मंजूर करून घेऊन, बांधकाम पूर्ण करून घेतले. औंढी कुणिकोणुर येथे आरोग्य उपकेंद्राची इमारत मंजूर करून घेऊन काम पूर्ण करून घेतले. रेवनाळ येथे ग्रामपंचायत इमारत , वाचनालय इमारत, बिरोबा मंदिराजवळ सांस्कृतिक भवन, मायाका मंदिर समोरील सभामंडप ही सर्व कामे त्यांच्या कार्याची साक्ष देत आहेत. 
         त्यांच्या विविध क्षेत्रातील कार्यामुळे त्यांना तालुकास्तरीय जिल्हास्तरीय व  राज्यस्तरीय आदर्श शिक्षक, समाज भूषण अश्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. असे एक अभ्यासू व्यक्तिमत्व काँग्रेस पक्षामध्ये घेण्यात आमदार विक्रमसिंह दादा सावंत यांना यश आल्यामुळे तालुक्यात काँग्रेस पक्षाला निश्चित फायदा होणार आहे. त्यांच्या काँग्रेस पक्ष प्रवेशासाठी काँग्रेस तालुका अध्यक्ष अप्पाराया बिराजदार माजी सभापती बाबासाहेब कोडग, मारुती पवार, काँग्रेस तालुका सचिव नाना शिंदे, नगरसेवक भूपेंद्र कांबळे, अशोकराव बन्नेणावर, अँड युवराज निकम, पं. स. सदस्य रवींद्र सावंत, निलेश बामणे यांनी विशेष प्रयत्न केले.

Post a Comment

0 Comments