जत तालुका प्राथमिक शिक्षक संघटनांची बैठक संपन्नजत/प्रतिनिधी: जत तालुका प्राथमिक शिक्षक संघटनांची बैठक गटविकास अधिकारी दिनकर खरात यांनी आयोजित केली होती. या बैठकीमध्ये शिक्षकांच्या अडी-अडचणी तसेच शाळांबाबतीत काही प्रश्न उपस्थित केले.

         यावेळी जत तालुका प्राथमिक शिक्षक संघाचे तालुकाध्यक्ष भारत क्षीरसागर यांनी शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न मांडले. वरिष्ठ वेतन श्रेणी, सेवा पुस्तके अद्यावत करणे, शालेय विद्युतीकरण, शाळा किरकोळ दुरुस्ती व मोठी दुरुस्ती, आदर्श शिक्षक पुरस्कार, रुग्ण कल्याण समितीवर प्राथमिक शिक्षकांचा सदस्य घेण्यासंदर्भात पत्रव्यवहार करणे, शंभर टक्के शाळा भरवणे व शाळांच्या वेळाबाबत ही चर्चा करण्यात आली. आयकर व सी एम पी प्रणाली संदर्भातही चर्चा करण्यात आली व त्यावर योग्य तो मार्ग काढण्याचे ठरले. गटविकास अधिकारी दिनकर खरात यांनी सर्व प्रश्न लवकरच मार्गी लावू असे सांगितले.

        यावेळी विस्तार अधिकारी तानाजी गवारे, सुखदेव वायदंडे, लिपिक व कर्मचारी युनियनचे सांगली जिल्हा कार्याध्यक्ष राजू कांबळे, लिपिक व कर्मचारी युनियनचे तालुका अध्यक्ष संतोष गुरव, बीआरसीचे तज्ञ मार्गदर्शक सुरेंद्र सरनाईक तसेच सर्व संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments