बेवनूर येथील डी.बी. एल. कंपनी विरोधी कडक कारवाई विरोधी जत तालुका राष्ट्रीय काँग्रेस व संभाजी ब्रिगेडच्या वतीने एकदिवसीय लाक्षणिक उपोषण


जत/प्रतिनिधी: मौजे बेवनूर ता.जत तेथील डी.बी. एल. कंपनीकडून अवैधरित्या सुरू असलेल्या उत्खननाबाबत संभाजी ब्रिगेड कडून वारंवार आंदोलने व उपोषण करून देखील प्रशासनाकडून कंपनी विरोधात कडक कारवाई होत नसल्याच्या निषेधार्थ आज जत प्रांतअधिकारी कार्यालयासमोर संभाजी ब्रिगेड सांगली जिल्हा व जत तालुका राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले. येत्या दोन ऑक्टोबर पर्यंत प्रशासनाने दखल न घेतल्यास आणखी तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा संभाजी ब्रिगेड सांगली जिल्हा कार्याध्यक्ष श्रेयस नाईक यांनी दिला आहे.
        महसूल प्रशासनाकडून दिनांक १०/०८/२०२१ रोजी मौजे बेवनूर ता. जत जि. सांगली येथे डी.बी. एल. कंपनीवरती कारवाई न केल्याने व शेतकऱ्यांचे नुकसान भरपाई न दिलेबाबत निवेदन सादर केले होते. परंतु त्यावरती आजअखेर कोणतीही कार्यवाही न झाल्याने तसेच न्याय न मिळाल्याबाबत संभाजी ब्रिगेडच्या वतीने आज पुन्हा जत प्रांत कार्यालयास एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले.
        संभाजी ब्रिगेड कडून दिनांक ०३/११/२०२० पासुन आज अखेर पर्यंत वारंवार निवेदन केलेली आहेत. प्रशासनाकडून दि. २६/०१/२०२१ रोजीचे पत्र क्र. /गोण/खनिज/वशी/११/२०२१ हे पत्र देवून अटी व शर्तीचा भंग कंपनीकडून झाला असल्यास त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई करु असे पत्र काढून आम्हास आंदोलनापासून परावृत्त केले आहे. प्रत्यक्ष दर्शनी दि. २६/०१/२०२१ रोजी स्थळ पाहणी आपण व मा. तहसिलदारसो, तसेच तलाठी, मंडळ अधिकारी, शेतकरी, सरपंच यांच्या उपस्थीतीमध्ये उत्खनन क्षेत्रास गट नं. २५१ या गटामध्ये सेपझोन न सोडता केलेल अतिक्रमण तसेच बोअर बलास्टमुळे परिसरातील घरांना भेगा पडुन झालेले नुकसान, तसेच संरक्षित कंपाऊंड उत्खनन क्षेत्रास केले नसल्यामुळे निर्माण झालेला धोका, बोअर ब्लास्टमुळे लोकवस्ती मध्ये दगड पडुन प्राणी व मनुष्य जिवास निर्माण झालेला धोका, प्रत्यक्ष दर्शनी दाखवण्यात आला परंतु जो अहवाल जिल्हाधिकारी यांचे कार्यालयास सादर करण्यात आला. त्यामध्ये सत्यपरिस्थीती न मांडता वेगळे पंचनामे सादर करुन वेगळ्या पंचाच्या सह्या घेवून शेतकऱ्यांची फसवणुक महसूल विभागाकडून केली आहे. प्रस्तुत प्रकरणामध्ये पंचनामे बदलणाऱ्या संबंधीत बेजबाबदार महसुल कर्मचाऱ्यांवर कायदेशीर कारवाई होणे आवश्यक आहे. म्हणून आम्ही परत दिनांक १०/०८/२०२१ रोजी मा. उपविभागीय अधिकारीसो जत यांना दिनांक १३/०८/२०२१ पासुन काम बंद आंदोलन संदर्भात निवेदन दिले होते. तसेच दिनांक १३/०८/२०२१ रोजी आम्ही बेमुदत काम बंद अझेलन सुरु केले होते. त्यावेळी दिनांक १४/०८/२०२१ रोजी मा. उपविभागीय अधिकारी जत यांनी क्र./गोख/कावि / १९०/२०२१ या पत्रानुसार आम्हाला डी. बी. एल. कंपनीने शासनाच्या अटी व शर्तीच्या भंग झाल्याचे सिध्द झाले आहे. त्यानुसार डी. बी. एल. कंपनीवरती कारवाई करून संबधीत जागेभोवती मजबूत व सुरक्षीत कंपाऊंड चारही बाजूने करुन तसेच सायरन ची व्यवस्था करुन ग्रामपंचायत मध्ये लाऊड स्पिकरवरुन दवंडी देऊन ब्लास्टींग घेणे आवश्यक आहे. तसेच लोकवस्ती मधील लोकांना कळवण्यासाठी कंपनीने सुरक्षा कर्मचारी यांना उपस्थीत राहणेस सांगणे सुध्दा आवश्यक आहे. या गोष्टी पुर्ण होई पर्यंत सदर डी. बी. एल. कंपनीचे उत्खनन बंद ठेवणेस नोटी दिले. परंतु त्या पत्राच्या अनुषंगाने काम बंद ठेवण्याचे असताना देखील संबंधीत कंपनी जोर जबरदस्तीने पोलीस प्रशासनास हाताशी धरून काम चालु करत आहे.
       महसूल प्रशासनाकडून दि. ०३/११/२०२० ते आजअखेर पर्यंत शेतकऱ्यांना न्याय दिला नाही व विलंब करुन दिशाभूल करण्याचा प्रयत्न केलेला आहे. व डी. बी. एल. कंपनीला मा. जिल्हा खनिकर्म अधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालया सांगली यांच्याकडून घालून दिलेल्या अटी व शर्ती १ ते ३५ यातील अटी व शर्तीचे पालन केले गेले नाही. तरीही संबंधीत महसुल प्रशासन अधिकारी यांनी कोणतीही कार्यवाही केली नाही..
       तरी शेतकऱ्यांच्या मागण्या व नुकसान या संबंधी दिलेले निवेदन दि. १०/०८/२०२१ मधील मुद्दे / मागण्या खालील प्रमाणे-
१) मौजे बेवनूर ता. जत येथील लोकवस्ती मध्ये बोअर ब्लास्टमध्ये येणान्या दगडाने जिवीतास धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे झालेले लोकवस्तीचे नुकसान व नंतर लोकवस्ती मध्ये दगड येणार नाहीत म्हणून संबधीत जबाबदार कर्मचा-यांकडुन लेखी हमीप्रमाणपत्र मिळावे.
२) मौजे बेवनूर येथील ग. नं. २५१ मधील उत्खनन क्षेत्रा शेजारी सेफ झोन सोडला नसल्याने शेतकऱ्यांचे होणारे नुकसान तेथील सेफ झोन ज्ञापन जमीन खरेदी करुन घेणे व नुकसान टाळणे.
३) सायंकाळी सूर्यास्तानंतर सन २०१८ पासून आजअखेर पर्यंत गौण खनिज उत्खनन चालु असते ते बंद करणे व आजअखेर उत्खनन केलेबद्दल कारवाई करणे,
४) मौजे बेवनूर येथील उत्खनन क्षेत्रा भोवती निकृष्ठ दर्जाचे संरक्षीत कंपाऊंड काढून चांगल्या दर्जाचे कंपाऊंड करणे.
५) ६ मीटर पर्यंत उत्खननाचा परवाना असताना ३० मीटर पर्यंत उत्खनन केलेने संबंधीतांवर कायदेशीर कारवाई होणेबाबत.
६) २५००० हजार बास उत्खनन परवाना खनिकर्म कडुन असताना त्यांनी जास्त उत्खनन केलेचे दिसुन येते त्याबाबत तातडीने संबंधीत जबाबदार वरिष्ठ अधिकान्यामार्फत पंचनामा करुन जादा उत्खनन केलेबाबत कडक कायदेशीर कारवाई व्हावी.
        इ. मागण्यांची पुर्तता आजअखेर झालेली नाही. तरी सदर वर नमुद मागण्या व शेतकऱ्यांची नुकसान भरपाई न दिल्यास येणाऱ्या काळात आणखी तीव्र आंदोलन छेडू. तसेच यातुन होणाऱ्या नुकसानीस प्रशासन जबाबदार राहील. असा इशारा जत तालुका राष्ट्रीय काँग्रेस व संभाजी ब्रिगेडच्या वतीने देण्यात आला.
        यावेळी कॉग्रेसचे युवक नेते नाथा पाटील, माणिक वाघमोडे ,श्रेयश नाईक जिल्हाकार्याध्यक्ष संभाजी ब्रिगेड सांगली, बापूसो शिंदे, संदिप नाईक, तानाजी शिंदे, संदिप शिंदे, ओंकार शिंदे, जतशहर अध्यक्ष प्रमोद काटे, ईर्शाद तांबोळी आदीजन उपस्थित होते. तसेच संजय देवनाळकर RPI(A)यांनी या उपोषणाला पाठिंबा दिला.

Post a Comment

0 Comments