विविध मागण्यांसाठी नोंदणी व मुद्रांक विभागातील अधिकारी व कर्मचारी बेमुदत संपावर

खरेदी-विक्रीचे व्यवहार खोळंबणार

जत/प्रतिनिधी: नोंदणी व मुद्रांक विभाग अराजपत्रीत अधिकारी व कर्मचारी यांनी दि.२१ सप्टेंबर पासून पुकारलेल्या बेमुदत संपास जत तालुका मुद्रांक विक्रेते व दस्त लेखनिक संघटनेचा जाहीर पाठींबा. 

        महाराष्ट्र राज्यातील नोंदणी व मुद्रांक विभागातील अधिकारी व कर्मचारी यांनी त्यांच्या  शासनाकडे गेली तीन चार वर्षे विविध मागण्यांसंदर्भात निवेदने देऊनही शासनाकडून त्यांच्या मागण्यांची दखल घेतली गेली नाही त्यामुळे संघटनेने नोंदणी व मुद्रांक विभागातील रिक्तपदे त्वरीत भरावीत यासह अन्य मागण्यांच्या पुर्ततेसाठी मंगळवार दि.२१ सप्टेंबर २०२१ पासून बेमुदत संप पुकारला आहे. 

       अराजपत्रीत अधिकारी व कर्मचारी यांच्या मागण्यांसंदर्भात शासनाने त्वरीत दखल घ्यावी व त्यांच्या मागण्यांसंदर्भात योग्य तो निर्णय घ्यावा यासाठी जत तालुका मुद्रांक विक्रेते व दस्त लेखनिक संघटनेने अराजपत्रीत अधिकारी व कर्मचारी यांच्या दि.२१ सप्टेंबर पासुन सुरू होणारे बेमुदत संपास जाहीर पाठींबा दिला आहे. जत तालुका मुद्रांक विक्रेते व दस्त लेखनिक संघटनेने आज पाठींब्याचे पत्र येथिल दुय्यम निबंधक अधिकारी श्री. सुनिल पाथरवट यांना दिले असून संप काळात मुद्रांक विक्री बंद ठेवणार असल्याचे कळविले आहे.

        यावेळी मुद्रांक विक्रेते अशोक पडोळकर, विजय जाधव, सिद्राया पाटील, मल्लापा तेली,बाबासाहेब काटे,नेताजी शिंदे, बाबासाहेब काशीद, श्रीकृष्ण पाटील, बबन चोरमुले, बाबासाहेब कदम, अरविंद तिल्ल्याळकर, गणपत वायफळकर आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments