जतमध्ये भरदिवसा पावणेचार लाखांची धाडसी चोरी; चोरटे सीसीटिव्हीत कैद


जत/प्रतिनिधी: शहरातील बँक ऑफ महाराष्ट्र समोरून चार चाकी गाडीत ठेवलेली तब्बल पावणेचार लाख रोकड अज्ञात चोरट्यानी भरदिवसा पळविली. ही घटना सोमवारी दुपारी तीनच्या सुमारास घडली. या प्रकाराने जत बाझार पेठेत एकच खळबळ उडाली. शिवाय हा प्रकार सीसीटीवी कॅमेरात कैद झाला असून. पोलीस या घटनेचा कसून तपास करत आहेत.
        याबाबत आधीच्या माहिती अशी की,  सिध्दनाथ ता.जत येथील शेतकरी संभाजी लकाप्पा चौगुले (वय ४२) यांनी सोमवारी द्राक्ष व डांळिब विक्रीचे पैसे जत शहरातील बँक ऑफ महाराष्ट्र येथील खात्यावर जमा झाले होते. जमा झालेले पैसे त्यांनी बँकेतून काढून झाल्यानंतर त्यांनी ही रक्कम बॅग मध्ये घालून ती बॅग त्यांनी आणलेल्या फोर्ड कंपनीच्या चारचाकी गाडीतील मागील सीट वर ठेवली होती. दरम्यान, त्यांच्या चार चाकी गाडीतील हवा कमी झाल्याचे दिसताच ते हवा भरण्यासाठी थांबले. त्याचवेळी एका अज्ञात पांढरा शर्ट घातलेल्या व तोंडाला मास्क बांधलेल्या चोरट्याने गाडीजवळ येऊन दरवाजा खोलून आत प्रवेश करत मागील सीटवर ठेवलेल्या पिशवीतील रोख रक्कम ३ लाख ७० हजार रुपये घेऊन पळत सुटला. हा प्रकार चौगुले यांच्या लक्षात येताच, त्यांनी त्याचा पाठलाग सुरू केला, तोवर पाठीमागून त्याचा दुसरा साथीदार दुचाकीवर येऊन त्याला घेऊन गेला. त्यामुळे चोरटे पळून जाण्यात यशस्वी झाले. हा सारा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असला तरी सीसीटिव्हीत लांबून चित्रण झाल्याने अंधुक व धूसर दिसत असल्याने आरोपींची ओळख पटली नाही. चौगुले यांनी तात्काळ जत पोलीसांना घटनेची माहिती दिली. आधिक तपास जत पोलिस करीत आहेत.

Post a Comment

0 Comments