अनावश्यक खर्चाला फाटा देत येळवीच्या अष्टविनायक गणेश मंडळाकडून ‘भगिनी निवेदिता’ला मदतजत/प्रतिनिधी: जत येथील विना अनुदानित तत्वावर चालणाऱ्या भगिनी निवेदिता या मुलीच्या वसतिगृहात सध्या २२ मुली राहतात. या मुलींना मदतीची गरज असल्याचे समजताच तालुक्यातील येळवी येथील श्रीमंत अष्टविनायक गणेश मंडळ व फ्रेंड्स ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष अविनाश पोरे व सदस्यांनी भगिनी निवेदिताला भेट देवून त्यांना मदतीचा हात दिला.
        जत येथील ‘भगिनी निवेदिता’ ही अनाथ, निराधार मुलींना आधार देणारी संस्था आहे. या संस्थेला तूर्त शासनाचे अनुदान मिळत नाही. जत येथील सामाजिक कार्यकर्ते परशुराम मोरे, योगेश मक, अमोल कुलकर्णी, भागवत काटकर, निलेश माने यांनी मदतीचे आवाहन केले होते. त्यांच्या या आवाहनाला प्रतिसाद देत श्रीमंत अष्टविनायक गणेश मंडळ व फ्रेंड्स ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष अविनाश पोरे व सदस्यांनी मदतीचा हात देण्याचा संकल्प केला. यंदा गणेशोत्सव साजरा न करता भगिनी निवेदिता येथील मुलींना जीवनवश्यक किटचे वाटप केले.
        यावेळी चिखलगी भुयार मठाचे मठाधिपती श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेचे सर्वेसर्वा तुकाराम बाबा महाराज,सामाजिक कार्यकर्ते योगेश मोटे, श्रीमंत अष्टविनायक गणेश मंडळ व फ्रेंड्स ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष अविनाश पोरे, नितिन पोतदार, संतोष पोरे, सागर कोळी, दिपक चव्हाण ,बापू चव्हाण, रमेश चव्हाण, नागेश शिंदे , विनायक तोडकर, संकेत गाममोटे, संतोष जमदाडे, ज्ञानेश्वर माने उपस्थित होते.  

Post a Comment

0 Comments