जत तालुक्यातील ३८ गावात तुकाराम बाबांनी दिल्या 'श्रीं'च्या मुर्त्या भेटजत/प्रतिनिधी: जत तालुक्यात एक गाव, एक गणपतीची प्रतिष्ठापना झाली पाहिजे, समाजातील एकोपा वाढला पाहिजे व आजच्या तरुणाईला योग्य दिशा मिळाली पाहिजे यासाठी कायम प्रयत्नशील असलेले चिखलगी भुयार मठाचे मठाधिपती, श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेचे सर्वेसर्वा तुकाराम बाबा महाराज यांनी यंदाही सलग तिसऱ्या वर्षी एक गाव एक गणपती बसविलेल्या गावांना श्री ची मूर्ती भेट दिली. तालुक्यात एक गाव एक गणपती बसविलेल्या मंडळासह ३८ गावातील मंडळांना 'श्री' ची मूर्ती भेट देत आपला निस्वार्थी अनोखा उपक्रम कायम ठेवला. 
         आपणही समाजाचे काही तरी देणे लागतो, समाजकार्य करा हा कानमंत्र घेवून श्री संत गाडगेबाबा, श्री संत बागडेबाबा यांच्या पावलावर पाऊल टाकत तुकाराम बाबा महाराज यांचे काम सुरूच असते. श्री संत सयाजी बागडेबाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्य २०१० पासून मंगळवेढा तालुक्यात तर २०१९ पासून जत तालुक्यात 'एक गाव एक गणपती' राबविणाऱ्या गावांना श्री ची मूर्ती भेट देण्यात येते यंदाही एक गाव एक गणपती राबविणाऱ्या मंडळाला श्री ची मूर्ती, वृक्षारोपन करण्यासाठी वृक्ष तसेच २०० मास्क, सॅनिटायझर देणार असल्याचे तुकाराम बाबा महाराज यांनी जाहीर केले होते.
         यावेळी श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेचे प्रशांत कांबळे, सुरज मणेर, विवेक टेंगले, बसवराज व्हनखंडे, फारुख शेख, रवी दोरकर, दत्ता सावळे, सिद्राया मोरे यांच्यासह गावातील प्रतिष्ठीत नागरिक, मंडळाचे पदाधिकारी आदीजण उपस्थित होते.
एक गाव एक गणपती बसविणारे मंडळ गौरवास पात्र-
तुकाराम बाबा महाराज म्हणाले, खरे तर कोरोनाच्या या कठीण काळात प्रत्येक गावांनी एक गाव एक गणपती बसवून आदर्श निर्माण करायला हवा होता पण तसे घडले नाही हे दुर्देव. जत तालुक्यासह राज्यात ज्या गावात एक गाव एक गणपती बसविले आहेत त्या ग्रामस्थांचे, मंडळाचे, तरुणाईचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. ही सर्व मंडळी गौरवास पात्र आहे.
       जत तालुक्यातही अनेक गावांनी एक गाव एक गणपती बसवून आपल्या आवाहनास प्रतिसाद दिला आहे त्या सर्व गावाना आपण स्वतः भेटून त्यांचे कौतुक करत त्यांना सन्मानपत्र, वृक्ष भेट, मास्क, सॅनिटायझर आदी भेट देणार असल्याचे तुकाराम बाबा महाराज यांनी सांगितले.


 

Post a Comment

0 Comments