कुंभारी येथे पिसाळलेल्या कुत्र्याचा पंधरा जनांना चावाजत/प्रतिनिधी: कुंभारी येथे पिसाळलेल्या कुत्र्याचा पंधरा जनांना चावा. गावक-यांनी पाठलाग करून कुत्र्याला मारल्याने गावक-यानी सोडला सुटकेचा निश्वास.
      याबाबत सविस्तर माहिती अशी की, जत तालुक्यातील कुंभारी येथे दोन दिवसापासून पिसाळलेल्या कुत्र्याने धुमाकूळ घातला होता. हे कुत्रे संपूर्ण कुंभारी परिसरात फिरत होते. व नकळतच एखाद्याच्या अंगावर जाऊन त्याला चावत होते. यामुळे कुंभारी परिसरातील लोक भयभीत झाली होती. काहीजन तर या कुत्र्याला शोधण्यासाठी त्याच्या मागावर होते. परंतु हे कुत्रे सर्वांना चकवा देऊन पसार होत होते. दोन दिवसात या पिसाळलेल्या कुत्र्याने कुंभारीतील जवळपास पंधरा लोकांचा चावा घेतला आहे. यातील अनेकजन सांगली व मिरज येथील दवाखान्यात उपचार घेत आहेत. 
        या पिसाळलेल्या कुत्र्यामुळे कुंभारी गावात भितीचे वातावरण निर्माण झाले होते. शनिवारी ही या कुत्र्याने अनेक जनांचा चावा घेतला होता. त्यामुळे कुंभारी ग्रामस्थानी या कुत्र्याचा पाठलाग करून त्याला ठार मारले. पिसाळलेले कुत्रे मारले गेल्याने कुंभारी येथील ग्रामस्थानी सुटकेचा निश्वास सोडला आहे. 
        कुंभारी येथे पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतल्याने आरोग्य विभागाने व ग्रामपंचायतीने सर्वे करून या कुत्र्याने ज्या लोकांना चावा घेतला आहे व ज्या पाळीव जनावरांच्या अंगावर या पिसाळलेल्या कुत्र्याने हल्ला केला आहे. त्या सर्वांना रेबिज प्रतिबंधक उपाययोजना म्हणून रेबीज लस देणेत यावी अशी मागणी नागरिकांतून केली जात आहे.

Post a Comment

0 Comments