सुसंस्कृत गणेशोत्सव मंडळाकडून रक्तदान शिबिर संपन्नजत/प्रतिनिधी: जत येथील सुसंस्कृत गणेशोत्सव मंडळ नाटेकर गल्ली जत या मंडळाकडून एक सामाजिक बांधिलकी जपत गणेश उत्सव काळामध्ये अनावश्यक खर्चाला फाटा देत तसेच एक सामाजिक हित जोपासण्याचा दृष्टिकोनातून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरामध्ये एकूण ५१ युनिट्स रक्त संकलन करुन सांगोला येथील रेवणील रक्तपेढीला अमूल्य असे सहकार्य केल्याबद्दल रक्तपेढीने सुसंस्कृत गणेश मंडळाचे आभार मानले व भविष्यात देखील असेच सहकार्य करण्याचे आवाहन केले.
      रक्तदान अमूल्य आहे..! रक्तदान करा जीवन वाचवा व रक्तदान हे श्रेष्ठदान आहे. त्यामुळे इतर गणेश मंडळाने देखील असे उपक्रम राबवून आपण समाजाचे काही देणे लागतो या भावनेतून असे उपक्रम राबवले पाहिजेत,असे मत मंडळातील कार्यकर्त्यांनी यावेळी बोलताना सांगितले. यावेळी सुसंस्कृत गणेशोत्सव मंडळाचे संस्थापक अध्यक्ष वैभव जाधव, सुषांत सुर्यवंशी, आदीनाथ माने, डॉ निलेश माने, रूपेश पिसाळ आदी जण उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments