जत उत्तर भागातील दीड कोटींच्या विकासकामाचे आ. सावंत यांच्या हस्ते भूमिपुजनजत/प्रतिनिधी: जत उत्तर भागातील वायफळ, अंतराळ, आंवढी, लोहगाव सिंगनहळ्ळी, मोकाशेवाडी, रेवनाळ या गावातील सुमारे १ कोटी ३४ लाख रूपयाच्या विकासकामाचे भूमिपुजन आमदार विक्रमसिंह सांवत यांच्या हस्ते करण्यात आले.
      जत तालुक्यात आमदार विक्रमसिंह सांवत यांच्या प्रयत्नातून मोठ्या प्रमाणात विकास कामे मंजूर झाले आहेत. अनेक कोटीचा निधी महाविकास आघाडी सरकारकडून तालुक्याला मिळाला आहे. त्या विकास कामांना सुरूवात झाली असून, येत्या तीन वर्षात तालुक्याचा चेहरा-मोहरा बदलेला दिसेल, असे यावेळी आमदार विक्रमसिंह सांवत यांनी सांगितले.
      तसेच यावेळी आमदार विक्रमसिंह सांवत यांची काँग्रेस कमिटीच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सर्व गावांमध्ये पारंपारिक वाद्य वाजवून सत्कार करण्यात आला. यावेळी माजी सभापती बाबासाहेब कोडग, तालुकाध्यक्ष आप्पाराया बिराजदार, पंचायत समिती सदस्य रविंद्र सांवत, युवक काँग्रेस सरचिटणीस प्रतापराव कोडग, स्थानिक संरपच, उपसंरपच, सदस्य व पदाधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments