जत मध्ये राष्ट्रवादीचाच करेक्ट कार्यक्रम राष्ट्रवादीचे अरुण साळे काँग्रेसच्या गोटात

जत राष्ट्रवादीचे अरुण साळे यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश निश्चित


जत/प्रतिनिधी: आम्ही प्रामाणिक राष्ट्रवादी पक्षात काम करत असताना आम्हाला निर्णय प्रक्रियेत न सामावून घेणे, अपमानास्पद वागणूक देणे तसेच आमचे समाजबांधवांवर वारंवार अन्याय होत आहे. त्यामुळे आम्ही आमचे सर्व समाज बांधव आमदार विक्रमसिंह सावंत यांच्यावरती विश्वास ठेवून येणाऱ्या २६ तारखेला संख येथे कॉंग्रेस पक्षामध्ये प्रवेश करीत आहोत. या पुढील काळात कॉंग्रेस पक्षाच्या झेंड्याखाली आम्ही प्रामणिकपणे काम करू तसेच आमदार सावंत हे आमच्या समाजाच्या प्रलंबित प्रश्नाकरिता आम्हाला साथ देतील व आम्हा सर्व समाज बांधवांना नक्की न्याय मिळवून देतील असा आम्हास विश्वास आहे. अशी माहिती चर्मकार समाज संघटनेचे जत तालुका अध्यक्ष किसन व्हनखंडे व युवा नेते अरुण साळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

Post a Comment

0 Comments