जत येथील ग्रामसेवक संजय भाते लाचलुचपतच्या जाळ्यातजत/प्रतिनिधी : कोसारी ग्रांमपंचायतीचे ग्रामसवेक संजय यमुना भाते (वय 46,रा.संभाजीनगर, मोरे कॉलनी जत) याला गोठ्याच्या मजूराच्या मस्टवर सही करण्यासाठी एक हजार रूपये लाच स्विकारताना लाचलुचपत विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले.
      जत पंचायत समितितील लुटीचे अनेक नमूने चर्चेत आहेत. प्रशासनावर नियंत्रण नसलेल्या प्रभारी गटविकास अधिकाऱ्यांच्या आवाक्याबाहेर कनिष्ठ अधिकारी, कर्मचारी गेले आहेत. येथील प्रत्येक विभागात पैसे दिल्याशिवाय कागद पुढे सरकत नाही, त्याला ग्रामपंचायतीचे ग्रामसेवकही अपवाद नाहीत, तर गरीब जनतेला अडवणूक करून थेट लुटत नव्हे तर खिशातून पैसे काढून घेत‌ असल्याची चर्चा कायम असते. काही ठेकेदार लोकप्रतिनिधीकडून कमाईसाठी अशा ग्रामसेवकांना डोक्यावर बसविले जात असल्याने ते यांचा आधार घेऊन थेट ग्रामस्थांना बेधडक ओरबडत असल्याच्या अनेक तक्रारी आहेत. सोमवारी अशा गरिबांना ओरबडणाऱ्या कोसारी गावचा‌ ग्रामसेवक भाते यांना लाचलुचपत विभागाने दणका दिला आहे. तालुक्यातील पंचायत समिती व गावागावातील लाचखोर  अधिकाऱ्यांना शोधण्याचे काम लाचलुचपत विभागासमोर आहे.असे प्रकार जोपर्यत थांबणार नाहीत,तोपर्यत नागरिकांना ओरबडण्याचे प्रकार संपणार नाही.
        कोसारीचे ग्रामसेवक संजय भाते यांनी तक्रारदार यांचे महात्मा गांधी रोजगार हमी योजने अंतर्गत पंचायत समिती जत यांचेकडून मंजूर झालेल्या गोठ्याचे काम तक्रारदार यांनी मजूर लावून सुरु केलेले आहे. सदर मजूरांचे हजेरी मस्टरवर सही करुन सदर मस्टर पंचायत समिती जत येथे पाठवीणेसाठी  भाते यांनी तक्रारदार यांचेकडे दोन हजार रूपये लाचेची मागणी केली असल्याबाबतचा तक्रारी अर्ज तक्रारदार लाचलुचपत विभागाकडे आला होता. लाचलुचपतच्या ब्युरोच्या कार्यप्रणालीप्रमाणे पडताळणी केली असता त्यामध्ये तक्रारदार यांचे गोठयाचे काम करणारे मजूर यांचे हजेरी मस्टरवर सही करुन मस्टर पंचायत समिती जत येथे पाठवीणेकरीता लोकसेवक भाते यांनी दोन हजार रुपये लाचेची मागणी करुन चर्चेअंती तक्रारदार यांचेकडे एक हजार रूपये लाच मागणी केली असल्याचे निष्पन्न झाले.
        त्यानंतर लागलीच संभाजीनगर, मोरे कॉलनी जत या ठिकाणी सापळा लावला असता लोकसेवक संजय भाते यांना एक हजार रूपये स्विकारलेनंतर रंगेहाथ पकडण्यात आले आहे.भाते यांच्याविरोधात‌ जत पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक अधिनियमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरिक्षक गुरूदत्त मोरे, प्रशांत चौगुले यांच्या पथकांने ही कारवाई केली.

Post a Comment

0 Comments