जत दुय्यम निबंधक कार्यालयात सर्व सुविधा उपलब्ध करून देऊ; सहजिल्हानिबंधक सुंदर जाधवजत/प्रतिनिधी : जत येथिल दुय्यम निबंधक कार्यालयात पक्षकारांची कोणतीही गैरसोय होणार नाही. कार्यालयाला सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील असे प्रतिपादन सहजिल्हानिबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी सांगली सुंदर जाधव यांनी केले आहे. 
        मुद्रांकजिल्हाधिकारी जाधव हे सहजिल्हानिबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार स्विकारल्यानंतर प्रथमच जत येथिल दुय्यम निबंधक श्रेणी-१ या कार्यालयाला भेट देण्यासाठी आले होते. यावेळी जतचे दुय्यम निबंधक व नोंदणी मुद्रांक विभाग अराजपत्रीत अधिकारी व कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्याचे जिल्हाध्यक्ष सुनिल पाथरवट यानी मुद्रांक जिल्हाधिकारी सुंदर जाधव यांचा बुफे देऊन सत्कार केला. यावेळी जत तालुका मुद्रांक विक्रेते व दस्त लेखनिक संघटनेनेही मुद्रांक जिल्हाधिकारी जाधव यांना बुफे देऊन त्यांचा सत्कार केला व जत येथिल दुय्यम निबंधक कार्यालयातील समस्याविषयी त्याना माहीती दिली. 
         यावेळी बोलताना मुद्रांक जिल्हाधिकारी तथा सहजिल्हानिबंधक सुंदर जाधव म्हणाले, जतचे दुय्यम निबंधक सुनिल पाथरवट यानी जत येथिल दुय्यम निबंधक कार्यालयाला एक वेगळेच रूप आणले आहे. कार्यालयाची जागा ही भाड्याची असतानाही या जागेचा चांगल्या प्रकारे सदुपयोग केला आहे.  त्यांचे काम कौतुकास्पद असून माझी जिल्ह्यातील ही पहिलीच भेट आहे.सांगली जिल्ह्यातील इतर तालुक्यातील दुय्यम निबंधक कार्यालयांना ही मी यापुढील काळात भेट देणार आहे. दुय्यम निबंधक कार्यालयात आलेल्या पक्षकारांची सर्व प्रकारची कामे चांगल्या प्रकारे पार पाडण्यासाठी आमचे प्रयत्न राहातील ज्या कार्यालयात गैरसोय असेल ती दूर करण्यासाठी माझे प्रयत्न राहातील. जत येथिल कार्यालयात अधून मधून वीजपुरवठा खंडित होत असतो त्यासाठी या कार्यालयाला चांगल्या प्रकारच्या बॅट-या बसविण्यात येतील असे अश्वासन देऊन पक्षकारांची कोणतीही अडचण असेल तर त्यानी केंव्हाही माझ्याशी संपर्क साधावा त्यांना योग्य ते मार्गदर्शन मिळेल असे आवाहन ही श्री. जाधव यानी केले. 
        यावेळी कार्यालयीन कर्मचारी जगदीश राठोड, तसेच  मुद्रांक विक्रेते अशोक पडोळकर, विजय जाधव, नेताजी शिंदे, बाबासाहेब काशीद, बबन चोरमुले, सिद्राया पाटील, बाबासाहेब काटे, श्रीकृष्ण पाटील, बाबासाहेब कदम, मल्लापा तेली, गणपत वायफळकर, आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments