उमदीच्या सुरेखा लोणी ठरल्या मिसेस इंडिया कर्नाटक गडीनाडू भागाच्या सौंदर्यवती


जत/प्रतिनिधी: कर्नाटकची राजधानी बेंगलोर येथे प्रतिभा संशीमठ यांच्या नेतृत्वाखाली रमदा पंचतारांकित हॉटेलमध्ये मिसेस इंडिया कर्नाटक या फॅशन शो स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत उमदीच्या सुरेखा वैभव लोणी या गडीनाडू कन्नड भागातून पहिल्या विवाहित महिला स्पर्धक म्हणून सहभागी झाल्या व मिसेस इंडिया कर्नाटक - ग्लोविंग ब्युटी व मिसेस इंडिया कर्नाटक गडीनाडू हा मुकुट पटकावून पहिल्या सौंदर्यवती ठरल्या. त्यामुळे महाराष्ट्राचा सीमाभाग व उत्तर कर्नाटकातील गडीनाडू ग्रामीण भागातील नागरिकांसाठी ही खूप आनंदाची व अभिमानाची गोष्ट आहे, असे प्रतिपादन परिसरातील नागरिक व्यक्त करत आहेत. 
         सुरेखा या कै. तम्माराया शिवप्पा लोणी (सेवा निवृत्त सहाय्यक पोलिस आयुक्त, मुंबई) यांच्या सून व वैभव लोणी यांची पत्नी आहेत. त्यांना काव्या व रुही या दोन मुली आहेत. उमदीसारख्या दुष्काळी व ग्रामीण भागातील फॅशनच्या दुनियेपासून कोसो दूर असणाऱ्या भागावर व परीस्थितीवर मात करत त्या यशाचा शिखर गाठून जिद्दी सौंदर्यवती ठरल्या, त्यामुळे सगळीकडे आनंदाची व अभिमानाची भावना निर्माण झाली आहे.
         या स्पर्धेत भाग घेण्यासाठी त्यांना त्यांच्या पती, दोन मुली व नातेवाईकांचे सहकार्य लाभले. भविष्यात यासारख्या स्पर्धेत सहभागी होऊन त्या विजेत्या ठराव्यात यासाठी व त्यांच्या पुढील वाटचालीसाठी आमच्या आभाळभर शुभेच्छा!

Post a Comment

0 Comments