हलसंगी येथील गोर-गरिब रुग्णांना चांगली सेवा मिळणार : हभप तुकाराम बाबा महाराजजत/प्रतिनिधी: डॉ. बसवराज तलवार यांनी ग्रामीण भागात शिक्षण घेतले. पुढील उच्च शिक्षण बेंगळुर सारख्या शहरात घेत एम.बी.बी.एस.ची पदवी संपादन केली. आज ग्रामीण भागामध्ये गोर गरिबांची रुग्णसेवा करण्याची संधी डॉ. तलवार यांना मिळाली ते त्यांचे भाग्य असल्याचे उद्गार हभप तुकाराम महाराजांनी व्यक्त केले. चडचण तालुक्यातील हलसंगी येथील बसव हॉस्पिटलचे उद्घाघटन चिखलगी भुयार मठाचे मठाधिपती हभप तुकाराम महाराज यांच्या हस्ते नुकतेच संपन्न झाले, यावेळी ते बोलत होते.
        तुकाराम बाबा महाराज पुढे म्हणाले की, हलसंगी गावची लोकसंख्या दहा हजाराहून अधिक आहे. डॉ. बसवराज तळवार गोरगरिबांची सेवा चांगल्या प्रकारे करतील असा ठाम विश्वास आहे.
       कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बसवराज पुजारी होते. याप्रसंगी परवेश घोडा, अस्लम अपरद पत्रकार रामणा सनाळे, दत्ता साळवे, दौलत आटपाडकर, अशोक कुलकर्णी काशिनाथ कापसे, लक्ष्मण तलवार आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments