उटगी येथील विजयालक्ष्मी पतसंस्थेचे काम आदर्शवत; ह.भ.प. तुकाराम महाराज

अपघातग्रस्त कुटूंबियांच्या वारसाला दिला दोन लाखाचा धनादेश!

जत/प्रतिनिधी : जतसारख्या दुष्काळी व ग्रामीण भागात उटगी येथील विजयालक्ष्मी सहकारी पतसंस्थेने अपघातात मयत झालेल्या सभासदाच्या वारसाला दोन लाखांंचा धनादेश दिला. तसेच गुणवतांचा सन्मान व कोव्हीड योद्ध्यांच्या केलेल्या सत्काराचे कार्य आदर्शवत असल्याचे प्रतिपादन चिखलगी भुयार मठाचे मठाधिपती व श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेचे सर्वेसर्वा तुकाराम बाबा महाराज यांंनी केले.
        उटगी येथील पिराप्पा हत्तळी यांचे अपघातात दुर्देवी निधन झाले होते. या निधनाने त्यांच्या कुटूंबियावर दुःखाचा डोंगर कोसळला. मयत पिराप्पा हत्तळी हे गावातीलच विजयालक्ष्मी पतसंस्थेचे सभासद होते. पिराप्पा हत्तळी यांच्या निधनानंतर त्यांचा वारसदारांना दोन लाख रुपये पतसंस्थेच्या वतीने देण्यात आले.
        पतसंस्थेकडून विविध क्षेत्रातील गुणवंत मान्यवरांचा तसेच कोरोना योद्धयांचा सत्कार करण्यात आला .कोरोना काळात आपल्या जीवाची बाजी लावून काम करणाऱ्या डॉक्टर ,नर्स,आशा कर्मचारी या कोरोना योद्धयांचा सत्कार केला.उटगी येथील प्रगतशील शेतकरी हणमंत दुधगी,सोन्याळचे काडप्पा काराजनगी यांचाही सत्कार करण्यात आला.
वैद्यकीय क्षेत्रात अत्यंत कमी वयामध्ये डॉक्टरेट पदवी मिळाल्याबद्दल डॉ. सोमशेखर मेत्री यांचा तसेच डॉ. वैशालीताई अचकनळी यांनी वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत यश संपादन केल्याबद्दल त्यांचाही सत्कार करण्यात आला.
        यावेळी बोलताना चिखलगी भुयार मठाचे मठाधिपती, श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेचे सर्वेसर्वा तुकाराम बाबा महाराज यांनी विजयालक्ष्मी पतसंस्थेचे कौतुक केले.
        या कार्यक्रमास माजी सभापती बसवराज बिराजदार, प्रगतशील शेतकरी हणमंत दुधगी, सरपंच सविता महादेव कांबळे, एम.एस पाटील, पतसंस्थेचे संस्थापक महांतेश पाटील, अध्यक्ष डॉ.शिवानंद पाटील, डॉ.सोमशेखर मेत्री, डॉ.वैशाली अचकनळी, काडप्पा काराजनगी आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे स्वागत महांतेश पाटील, सूत्रसंचालन चंद्रकांत डोळी, तर आभार डॉ.शिवगोंड पाटील यांनी मानले.

Post a Comment

0 Comments