महिलेने बस मध्ये दिला बाळास जन्म । चालक व वाहक यांनी दाखवली माणुसकी । आगार व्यवस्थापकांनी केला सत्कारजत/प्रतिनिधी: जत तालुक्यातील गोंधळेवाडी येथील वनिता शामराव गळवे या गरोदर मातेने बसमध्येच बाळाला जन्म दिल्याची घटना आज मंगळवार ता.१० रोजी सकाळी घडली. यावेळी जत आगाराचे चालक, वाहक आणि सह प्रवाशांनी प्रसंगावधान राखून महिलेला मदत केली.
        आज सकाळी जत - सांगली - कोल्हापुर एम.एच. 14 बी.टी.1210 ही बस जतहून कोल्हापूरकडे रवाना झाली. या बस मध्ये जत मधील गोंधळेवडी येथील महिला दवाखान्यात जाण्यास चढली. सदरची बस कवठेमहांकाळच्या पुढे जाँलीबोर्ड नजीक आल्या नंतर वनिता गळवी यांच्या अचानक पोटात दुखू लागले. या महिलेला प्रसव वेदना सुरू झाल्या चे पाहून बसमधील महिला मदतीसाठी पुढे आल्या. धावती बस रस्त्याच्या कडेला थांबवून या महिलेची प्रसुती करण्यात आली आणि वनिता यांनी गोंडस बाळाला जन्म दिला.
        त्यानंतर वनिता यांना घेऊन बसमधील प्रवासी आणि बसचे चालक व वाहक यांनी पुढे असणाऱ्या भोसे प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले आहे. बाळ आणि आई दोघांची तब्बेत चांगली आहे. यानंतर प्रसंगावधान राखून महिलेला मदत करणाऱ्या चालक बी. टी. माने आणि वाहक एस. एस. चव्हाण यांचा जत आगाराचे व्यवस्थापक आर.पी. घुगरे यांनी सत्कार केला आहे.

Post a Comment

0 Comments