जत तालुक्यात शासकीय पशुवैद्यकीय महाविद्यालय सुरु करा

रिपाई कडून ना. जयंत पाटील यांचा सत्कार

जत/प्रतिनिधी: महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील जत तालुक्याच्या दौऱ्यावर आले असता, यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने सत्कार त्यांचा करण्यात आला. म्हैसाळ योजनेच्या विस्तारित योजनेस मंजुरी देऊन 6 टी. एम. सी. पाणी तालुक्यातील 65 गावांसाठी विशेष प्रयत्न करून दिल्याबद्दल रिपाइंच्या शिष्टमंडळाने मा. जयंत पाटील यांना भेटून त्यांचा सत्कार व अभिनंदन केले. व सदरची योजना लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी विनंती करण्यात आली. 
        त्याचबरोबर जत शहरानजीक महाराष्ट्र शासनाचे खिलार कॅटल फार्मची चारशे एकर जमीन आहे. महाराष्ट्रात विस्ताराने सर्वात मोठा असणारा जत तालुका कायमस्वरूपी दुष्काळ असून या तालुक्यात तरुण व सुशिक्षित लोकांना रोजगार निर्मितीसाठी उदरनिर्वाहासाठी लांब पल्ल्याच्या पुणे मुंबई शहराकडे जाण्याशिवाय दुसरा पर्याय नाही.  त्यातच कोरोनासारख्या महाभयंकर आजारामुळे मोठ्या शहरातील खाजगी व निमसरकारी कंपन्या बंद झाल्यामुळे तालुक्यातील युवक वर्गावर उपासमारीची वेळ आलेली आहे. जत तालुक्यात कोणताच उद्योग धंदा नाही. याचा सारासार विचार करून तालुक्यातील महाराष्ट्र शासनाच्या चारशे एकर जागेत शासकीय  पशुवैद्यकीय महाविद्यालय चालू करावे त्यामुळे शेजारच्या बऱ्याच तालुक्यातील विद्यार्थी व छोट्या व्यावसायिकांना जगण्याची संधी मिळेल व्यवसायिक शिक्षणाचे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सुविधा उपलब्ध होईल अशा पद्धतीचे निवेदन मा. जिल्हाध्यक्ष संजीव कांबळे साहेब यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले. 
         यावेळी जिल्हा उपाध्यक्ष विकास साबळे वैद्यकीय सेल जिल्हाध्यक्ष मोहसिन इनामदार, दरीबडची ग्रामपंचायत सदस्य बंडु जाधव, राम वाघे, रणजीत साबळे इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments