जतमध्ये ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांना सर्वपक्षीय श्रद्धांजली । दुष्काळाची व्यथा पोट तिडकीने मांडणारे एकमेव नेते गणपतराव आबाच; आ. विक्रमसिंह सावंत

 


जत/प्रतिनिधी: शेकाप पक्षाचे ज्येष्ठ नेते सांगोल्याचे माजी आमदार गणपतरावजी देशमुख (आबा) यांना विधानसभेमध्ये दहा वर्षे काम करताना पाहिले आहे. दुष्काळाच्या व्यथा पोटतिडकीने मांडून प्रश्न व्यवस्थित मार्गी लावणारे एकमेव आमदार म्हणून त्यांचे नाव घेतले तर वावगे ठरणार नाही. अशा ज्येष्ठ नेत्यांच्या निधनानंतर राज्याच्या राजकारणात मोठी, न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. असा शोक व्यक्त करीत जतचे आम. विक्रमसिंह सावंत यांनी माजी आम.गणपतरावजी देशमुख यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.
       यावेळी जत येथील आयोजित शोकसभा कार्यक्रमावेळी उपस्थित विद्यमान आमदार विक्रमदादा सावंत, विद्यमान लोकनियुक्त जत नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सौ. शुभांगीताई बन्नेनवर, माजी आमदार विलासराव जगताप, जतचे पोलीस निरीक्षक आप्पासाहेब कोळी, संभाजी ब्रिगेडचे राज्याचे अध्यक्ष श्रीमंत कोकाटे व तालुक्यातील युवा नेते, जिल्हा परिषद सरदार पाटील, पंचायत समिती सदस्य आप्पासाहेब मासाळ, प्रहार संघटना जत तालुका प्रमुख सुनिल बागडे, आर.पी.आयचे संजय कांबळे, शिवसेनेचे नेते अमित दुधाळ, दिनकर पतंगे, अँड.सुरेश घागरे, तुकाराम माळी (सर), सर्वोदय पतसंस्थेचे संचालक रामचंद्र मदने, सामाजिक कार्यकर्ते पुकार आवटे, आदी मान्यवरांच्या उपस्थितीत श्रद्धांजली वाहण्यात अली.


Post a Comment

0 Comments