संभाजी ब्रिगेड जत तालुका अध्यक्ष पदी दिपक पाटणकर यांची निवडजत/सांगली: आज रोजी मराठा सेवा संघ सांस्कृतिक भवन सांगली येथे संभाजी ब्रिगेडची बैठक पार पडली. यावेळी मराठा उद्योजक कक्षाचे प्रदेशाध्यक्ष शिवश्री राजेंद्रसिंह पाटील यांच्या हस्ते संभाजी ब्रिगेड जत तालुकाअध्यक्ष पदी शिवश्री दिपक (भाऊ) पाटणकर व जत तालुका संघटक पदी शिवश्री इर्शाद तांबोळी यांना नियुक्तीपत्र देऊन त्यांची निवड करण्यात आली. यावेळी जत तालुका अध्यक्ष दिपक पाटणकर यांनी सांगितले कि, संभाजी ब्रिगेडची गाव तेथे शाखा स्थापना करणार तसेच शेतकरी, गोरगरिब जनतेला न्याय मिळवून देणार असे मत त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले. 
      यावेळी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र पाटील, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाकार्याध्यक्ष श्रेयश नाईक, जिल्हाउपाध्यक्ष अजित पाटील, जिल्हासचिव ऋतुराज पवार, अमोल कदम पदाधीकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments