बेवनूर येथील अवैद्य गौण खनिज विरोधात महसुल प्रशासन कारवाई करत नसलेमुळे संभाजी ब्रिगेडच्यावतीने काम बंद आंदोलनजत/प्रतिनिधी: बेवनूर ता.जत येथील अवैद्य गौणखनिज उत्खनन करणार्या दिलीप बिल्डकॉन कंपनीवर महसुल प्रशासन कारवाई करत नसल्याचे विरोधात संभाजी ब्रिगेड व ग्रामस्थ बेवनूर यांच्यावतीने काम बंद आंदोलन करणार अशा प्रकारचे निवेदन उपविभागीय अधिकारीसो जत, तहसिलदारसो जत व पोलिस निरीक्षक जत यांना संभाजी ब्रिगेड सांगलीचे जिल्हा कार्याध्यक्ष श्रेयश नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत देण्यात आले यावेळी बापूसो शिंदे, संदीप नाईक, बबन शिंदे ऍड8जण उपस्थित होते..
         दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की बेवनूर ता.जत येथील जमिन गट नं.२४९ मध्ये डी.बी.एल (दिलीप बिल्डकॉन प्रा.लि.) कंपनीचे अवैध उत्खनन पुर्णपणे बंद करणे व शेतकरी नुकसान भरपाई देणे या संदर्भात महसूल प्रशासन संदर्भीय प्रशासन कारवाई करत नसलेने संभाजी ब्रिगेड व ग्रामस्थ यांचेकडून बेमुदत काम बंद आंदोलन करण्यात येणार आहे.
        प्रशासनाकडून डी. बी .एल (दिलीप बिल्डकॉन प्रायव्हेट लिमिटेड कंपनी) वरती खालील प्रकारची कारवाई न झाल्यास आम्ही काम बंद आंदोलन दिनांक १३/ ०८/ २०२१ रोजी पासून करणार आहोत. आमचे मुद्दे खालील प्रमाणे आहेत. 1) मौजे बेवनूर तालुका जत येथील लोकवस्तीमध्ये बोअर  ब्लास्टमध्ये येणाऱ्या दगडाने जीवितास धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे झालेले लोकवस्तीचे नुकसान व नंतर लोकवस्तीमध्ये दगड येणार नाहीत म्हणून संबंधित जबाबदार कर्मचाऱ्याकडून लेखी हमीप्रमाणपत्र मिळावे. 2) मौजे बेवनूर येथील गट नंबर 251 मधील  उत्खनन क्षेत्रा शेजारी सेफ झोन  सोडला नसल्याने  शेतकऱ्यांचे होणारे नुकसान येथील सेफ झोन  मापन जमीन  खरेदी  करून घेणे व नुकसान टाळणे. ३) सायंकाळी सूर्यास्तानंतर सन 2018 पासून आज पर्यंत गौण खनिज उत्खनन चालू असून ते बंद करने व आजअखेर उत्खनन  केल्याबद्दल  कारवाई करणे. ४)मौजे बेवनूर  येथील उत्खनन क्षेत्राभोवती निकृष्ट दर्जाचे संरक्षित कंपाउंड काढून चांगल्या दर्जाचे कंपाउंड करणे. ५)६ मीटरपर्यंत उत्खननाचा परवाना असताना 30 मीटर पर्यंत उत्खनन केलेले संबंधितांवर कायदेशीर कारवाई होणेबाबत. ६) 25 हजार ब्रास उत्खनन परवाना खनिकर्म कडून असताना त्यांनी जास्त उत्खनन केल्याचे दिसून येते त्याबाबत तातडीने संबंधित जबाबदार वरिष्ठ अधिका-यामार्फत  पंचनामा करून ज्यादा उत्खनन केल्याबाबत  कडक कायदेशीर कारवाई व्हावी तरी आमच्या वरील मागण्या संदर्भात आणि दिनांक १३/०८/२०२१  पासून बेमुदत काम बंद आंदोलन डि.बी.एल (दिलीप बिल्डकॉन कंपनी)उत्खनन क्षेत्र मौजे बेवनूर तालुका जत जिल्हा सांगली येथे सोशल डीस्टन्सचे पालन करून ग्रामस्थ व संभाजी ब्रिगेड सांगली यांच्यातर्फे करणार आहोत.

Post a Comment

0 Comments