तोंडोली येथील आदर्श शिक्षिका सौ.शोभा खलिपे यांची वरिष्ठ मुख्याध्यापिका पदी पदौन्नतीसांगली: तोंडोली ता.कडेगाव येथील आदर्श शिक्षिका सौ.शोभा खलिपे यांना जि.प.शाळा नेवरी येथे वरिष्ठ मुख्याध्यापिका पदी पदौन्नती मिळाल्याबद्दल त्यांचा सत्कार समारंभ घेण्यात आला. सौ.शोभा खलिपे या विद्यार्थीप्रिय शिक्षिका असल्याने त्यांना पदोन्नती मिळाल्याबद्दल त्यांचा माजी विद्यार्थ्यांनी सत्कार घेऊन सन्मान केला.
      यावेळी बोलताना माजी सरपंच मा.विजय मोहिते (आप्पा) म्हणाले, की सौ.शोभा खलिपे या आमच्या गावच्या शिक्षिका आहेत. याचा आम्हाला अभिमान आहे, त्यांनी अनेक विद्यार्थ्यांना घडवलेले आहे. त्यांच्या हाताखालून शिकून गेलेले अनेक विद्यार्थी इंजिनिअर, डॉक्टर, वकील, शिक्षक, भारतीय सेना, पोलीस तसेच ग्रामपंचायत सदस्य अशा अनेक हुद्द्यावर कार्यरत आहेत.
      सेवानिवृत्त शिक्षक मा.सहदेव मोहिते(गुरुजी) म्हणाले, सौ.शोभा खलिपे यांनी अनेक शाळेत चांगले कामकाज केले आहे. तसेच त्यांनी त्यांच्या कार्यकिर्दीत सहकारी शिक्षकांच्या साहाय्याने जि.प.शाळा येतगाव ला ISO मानांकन प्राप्त करून आदर्श शाळा केली.
      यावेळी सौ.शोभा खलिपे म्हणाल्या की, आत्तापर्यंत मी प्रामाणिकपणे विद्यार्थ्यांना घडवण्याचे काम केले आहे. त्याचप्रमाणे इथून पुढे पण करत राहीन तसेच अनेक विद्यार्थ्यांना घडवेन व गावचे नाव लौकिक करेन. विद्यार्थी घडतो तोच शिक्षकाचा खऱ्या अर्थाने सन्मान असतो. तसेच यावेळी ऍडव्हान्स खबरचे संपादक मा.अश्विनी खलिपे यांची ऑल इंडिया पोलीस जनसेवा संघटनेच्या सांगली जिल्हा कायदेशीर सल्लागार पदी निवड झालेबद्दल सत्कार करण्यात आला.
       या कार्यक्रमाचे नियोजन विश्वविजय युवा मंचचे कार्यकर्ते आणि तोंडोली ग्रामस्थ यांनी केले होते. कार्यक्रमाची सुरवात प्रास्ताविक वक्तृत्व गुणसंपन्न असणारे मा.संभाजी मोहिते (सर) यांनी केले आणि मा.सहदेव मोहिते गुरुजी यांनी आभार व्यक्त केले . त्याप्रसंगी तोंडोली गावचे माजी सरपंच मा.विजय मोहिते (आप्पा), जेष्ठ नेते मा.शंकर मोहिते (नाना), मा.सहदेव मोहिते (गुरुजी), मा.अशोक मोहिते (नाना), मा.प्रमोद मोहिते (फौजी), मा.महादेव पोतदार (दास गुरुजी), सामाजिक कार्यकर्ते मा.प्रमोद कुंभार (भाऊ), शुभंकरोती चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव मा.श्रीकांत खलिपे (राजू), मा.अंकुश राऊत, मा.सुदेश मोहिते, मा.संभाजी मोहिते (सर) , मा.बाळू मुलाणी, मा.भीमराव सोनताटे , मा.सर्जेराव महापुरे तसेच विश्वविजय युवा मंचचे सर्व कार्यकर्ते व ग्रामस्थ आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments