संभाजी ब्रिगेडच्या कामबंद आंदोलनाची प्रशासनाने घेतली दखल । दिलीप बिल्डकॉन कंपनीला काम बंदची नोटीसजत/प्रतिनिधी: जत तालुक्यातील मौजे बेवनूर येथील डीबीएल कंपनीच्या विरोधातील संभाजी ब्रिगेडच्या आंदोलनची प्रशासनाने दखल घेत, सुरक्षेच्या उपाययोजना करेपर्यत दिलीप बिल्डकॉन कंपनीला काम बंद ठेवण्याची नोटीस देण्यात आली आहे. नायब तहसीलदार डी.पी. माळी व पोलीस निरिक्षक आप्पासाहेब कोळी यांनी तसे आंदोलकांना पत्र दिले आहे.
       बेवनूर परिसरात दिलीप बिल्डकॉन कंपनीच्या उत्खननामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. संभाजी ब्रिगेड व शेतकऱ्यांनी वारंवार तक्रार करून ही प्रशासनाने दखल घेतली नाही. त्यामुळे संभाजी ब्रिगेड व शेतकऱ्यांनी १३ ऑगष्टपासून कामबंद आंदोलन सुरू केले होते. प्रशासनाने या आंदोलनाची दखल घेत, दिलीप बिल्डकॉन कंपनीला खाण चालकाने सुरक्षेच्या दृष्टीने उपाय योजना सुचवून त्यांची पुर्तता होत नाही, तोपर्यत संबंधित कंपनीस प्रस्तुत खाणीमधील दगड उत्खनन बंद करणेबाबत सुचना दिलेल्या आहेत. उत्खनन सुरक्षेच्या उपाय योजनांची अंमलबजावणी सुचना देण्यात आल्या आहेत. आंदोलन स्थगित करावे अशा सुचनाचे प्रशासनाकडून लेखी पत्र आंदोलकांना देण्यात आले. त्यामुळे आंदोलकांनी तात्पुरते आंदोलन मागे घेतले आहे.
     या आंदोलनात संभाजी ब्रिगेडचे जिल्हाकार्याध्यक्ष श्रेयश नाईक, बापूसो शिंदे, तानाजी शिंदे, मच्छिंद्र शिंदे, संदिप नाईक, बबन शिंदे, राजेंद्र शिंदे, भारत शिंदे, राजाराम व्हनमाने, संभाजी शिंदे, मोहन पाटील आदी शेतकऱ्यांनी भाग घेतला.

Post a Comment

0 Comments