जत/प्रतिनिधी: मौजे बेवनूर ता. जत डीबीएल कंपनी उत्खनन क्षेत्रासमोर आज १३ ऑक्टोंबर पासून संभाजी ब्रिगेड व अन्यायग्रस्त शेतकरी, ग्रामस्थ यांच्या तर्फे बेमुदत कामबंद आंदोलन सुरू करण्यात आले आहे. मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत मागे हटणार नाही, अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे.
मौजे बेवनूर तालुका जत येथील लोकवस्तीमध्ये बोअर ब्लास्टमध्ये येणाऱ्या दगडाने जीवितास धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे झालेले लोकवस्तीचे नुकसान व नंतर लोकवस्तीमध्ये दगड येणार नाहीत म्हणून संबंधित जबाबदार कर्मचाऱ्याकडून लेखी हमीप्रमाणपत्र मिळावे. मौजे बेवनूर येथील गट नंबर २५१ मधील उत्खनन क्षेत्रा शेजारी सेफ झोन सोडला नसल्याने, शेतकऱ्यांचे होणारे नुकसान येथील सेफ झोन मापन जमीन खरेदी करून घेणे व नुकसान टाळणे. सायंकाळी सूर्यास्तानंतर सन २०१८ पासून आज पर्यंत गौण खनिज उत्खनन चालू असून ते बंद करने व आजअखेर उत्खनन केल्याबद्दल कारवाई करणे. मौजे बेवनूर येथील उत्खनन क्षेत्राभोवती निकृष्ट दर्जाचे संरक्षित कंपाउंड काढून चांगल्या दर्जाचे कंपाउंड घालणे. ६ मीटरपर्यंत उत्खननाचा परवाना असताना ३० मीटर पर्यंत उत्खनन केलेले संबंधितांवर कायदेशीर कारवाई व्हावी. २५ हजार ब्रास उत्खनन परवाना खनिकर्म कडून असताना त्यांनी जास्त उत्खनन केल्याचे दिसून येते. त्याबाबत तातडीने संबंधित जबाबदार वरिष्ठ अधिकार्यामार्फत पंचनामा करून ज्यादा उत्खनन केल्याबाबत कायदेशीर कारवाई व्हावी महसुल व सबंधित प्रशासनाकडून बेजबाबदारपणा केल्याने अटी व शर्तीचे पालन डीबीएलने गेली तीन वर्षे केले नाही. शेतकर्यांना त्रास झाला तरी कारवाई झाली नाही. म्हणून बेमुदत आंदोलन करणेस भाग पडले आहे. यावेळी संभाजी ब्रिगेड सांगलीचे जिल्हा कार्याध्यक्ष श्रेयश नाईक, बापुसो शिंदे, तानाजी शिंदे, संदिप नाईक, बबन शिंदे, राजेंद्र शिंदे, भारत शिंदे, मच्छिंद्र शिंदे, राजाराम व्हनमाने, संदिप शिंदे, संभाजी शिंदे, मोहन पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
0 Comments